रसायनी

पनवेल ते पळस्पे दरम्यान असणारा कालुन्द्रें येथील रेल्वे पुलाखाली सखोल भाग असल्याने गटारातील पाणी पूर्णपणे रस्त्यावर जमा होते.

परिणामी राष्ट्रीय महामार्ग NH-48 मार्गावर पावसाळ्यामध्ये वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प होत असल्याने लांबलचक वाहनांच्या रांगा लागतात.

या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्यावतीने केंद्रिय रेल्वे सल्लागार समिती सदस्य भारत सरकार अभिजित दादा पाटील यांना रसायनी येथील पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन सदर समस्या सोडविण्यासाठी मागणी केली आहे.

यावेळी सुदाम  पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव ), गणेश थोरवे (पश्चिम महाराष्ट्र सचिव, पोलिस सेवा संघटना), सागर कुरंगळे (रायगड जिल्हा उपाध्यक्ष,पोलिस सेवा संघटना) उपस्थित होते.