जन्म.१ जून १९६२ पुणे येथे.
प्रेमा किरण यांनी अश्रूंची झाली फुले, एखाद्याचे नशीब, साष्टांग नमस्कार, वसंत सेना, गाढवाचं लग्न, लवंगी मिरची कोल्हापूरची अशा अनेक नाटकांतून त्यांनी लोकप्रिय भूमिका केल्या. प्रथम दूरदर्शनवर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी कार्यक्रमांचे सादरीकरण केले त्यापूर्वी त्यांनी गावोगावी दोन हजारांहून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला.अर्धांगिनी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकलं.प्रेमाकिरण भट यांनी मराठीसह अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. नव्वदीच्या दशकात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्या चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत त्यांची ऑनस्क्रिन जोडी विशेष पसंत केली गेली. धुमधडाका सिनेमातील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर अंबाक्का म्हणजे प्रेमा ताई किरण यांची ही भूमिका खूप गाजली. धुमधडाका, दे दणादण, गावरान गंगू, उमंग, उतावळा नवरा, हिरवा चुडा, गाव थोर पुढारी चोर, लग्नाची वरात लंडनच्या घरात हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयासोबतच त्यांनी १९८९ मध्ये ‘उतावळा नवरा’ या आलेल्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. एकता कल्चरल अॅकॅडमीकडून जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. प्रेमाकिरण भट यांचे १ मे २०२२ निधन झाले.