कॅरी इंदेव लॉजिस्टिकमध्ये संभाजी ब्रिगेड कामगार युनियनची स्थापना, नामफलकाचे अनावरण
रसायनी
संभाजी ब्रिगेड कामगार युनियनच्यावतीने रसायनी कोन रस्त्यानजीकच्या मेसर्स कॅरी इंदेव लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गेट मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजी ब्रिगेड जनरल कामगार युनियनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

कामगार क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत,परंतु युनियन सर्व सदस्यांच्या समस्याचे आम्ही नक्की निवारण करू आणि कामगारांना न्याय देवू असे उद्गार अध्यक्ष सचिन जगदीश सावंत देसाई यांनी मार्गदर्शन करताना काढले. या प्रसंगी युनियन चे अध्यक्ष सचिन जगदीश सावंत देसाई, संघठनेचे सचिव सुभाष सावंत, रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ मगर, खजिनदार, संतोष कदम, नवी मुंबई चे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पहुरकर,ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश पाटील, स्थानिक भूमिपुत्र जयवंत मुंडे, कर्जत तालुका अध्यक्ष विशाल माळी,खालापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील, रायगड जिल्हा सचिव मंगेश दस्वंते, पनवेल तालुका अध्यक्ष रमेश कोंडीलकर, कैरे शाखाप्रमुख सचिन केरे, रायगड जिल्हा सहसचिव सागर पाटील, मारुती नाना खंडागळे,युनिट अध्यक्ष दत्ता इंदलकर, आणि केरी इंदेव कंपनीचे सर्व कामगार उपस्थित होते.




















