जन्म.१४ जुलै १९७२ सांगली येथे.
जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका शाल्मली जोशी यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील मूलभूत धडे तीन वर्षांच्या लहान वयातच आई, माधुरी कुलकर्णी यांच्या कडून जवळपास आठ वर्षे घेतले. ज्येष्ठ गायक पं. चिंतुबुवा म्हैसकर व पं. रत्नाकर पै यांच्या शिष्या असलेल्या शाल्मली जोशी या प्रख्यात हिंदुस्थानी गायिका पद्मा तळवलकर यांची शिष्या राहिल्या आहेत. त्यांनी पद्मा तळवलकर यांच्या सोबत संपूर्ण भारतभर अनेक संगीत मैफिलींमध्ये साथ केली आहे. या काळात शाल्मली यांनि जयपूर-अत्रोली, किराणा आणि ग्वाल्हेर या तीन घरांच्या गायकीतील बारकावे पद्मा तळवलकर यांच्या कडून शिकून घेतले. तसेच पं.सुरेश तळवलकर यांच्या एका अनोख्या प्रयोगात शाल्मली जोशी यांनी भाग घेतला होता. पं.सुरेश तळवलकर हे तबल्या एकट्या सादरीकरणासाठी शाल्मली जोशी यांनी गायलेल्या गायना (पारंपारिकपणे याला ‘नगमा’ म्हणतात) मध्ये लहरा लावण्याचा हा प्रयोग होता.
या तीन घरांच्या संगीताच्या परंपरेची विविधता व गायकी शिकल्यानंतर शाल्मली जोशी यांनी जयपूर- अत्रोली घराण्याच्या गायकीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) मुंबई तर्फे ‘सुरश्री केसरबाई केरकर स्कॉलरशिप’ शाल्मली जोशी यांना मिळाली आहे. तसेच “आचार्य रातांजेककर फाउंडेशन मुंबई” यांच्या कडून शिष्यवृत्ती, “सज्जन मिलाप मुंबई” कडून शिष्यवृत्ती, ‘दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र मुंबई” इ. गुणवत्ता शिष्यवृत्ती व पी.के.के.जी.जी. पुरस्कार,असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी सवाई गंधर्व मोहोत्सव पुणे” येथे आपली कला सादर केली आहे.
‘वेटिंग फॉर गोदो’, ‘ सूर्य पाहिलेला माणूस’, ‘ उजळल्या दिशा’ ,’ सत्यशोधक, समाजस्वास्थ’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. तेंडुलकर आणि हिंसा’, ‘ कचराकोंडी’, नाट्यलेखक सतीश आळेकर हे त्यांनी दिगदर्शित केलेले लघुपट आहेत.