दुरुस्ती न झाल्यास स्वातंत्र्य दिनी करणार उपोषण –

खालापूर तालुक्यातील काही ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था इतकी बिकट बनली आहे, त्यामुळे वाहन चालकांसह पादचारी प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खालापूर तालुक्यातील घोडीवली फाटा मार्गे नावंढे, केळवली, वणी, बीड, जांबरुंग, खरवई, डोळवली रस्ता पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्ड्याच्या विळख्यात सापडल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने खड्ड्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला करावा लागत असून मार्गावरील काही मोऱ्यांना भगदाड पडले असले तरी संबंधित प्रशासनाला मात्र या खड्ड्यासह मोऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने दररोज याठिकाणी लहान – मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असताना प्रशासनाला जागे करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व पक्षीय नेते व ग्रामस्थांनी एकत्र येत खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस ठाणे यांना 26 जुलै रोजी निवेदन देत या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली असून जर काम त्वरित सुरू न केल्यास 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषण करणार असल्याने माहिती निवृत्ती पिंगळे यांनी दिली आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी राज्य सरचिटणीस हनुमंत पिंगळे, भाजपा नेते निवृत्ती पिंगळे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, अँड.राजेंद्र येरुणकर, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, माजी पं.स.सदस्य अक्षय पिंगळे, मनसे तालुकाध्यक्ष सचिन कर्णुक, शिवसेना विभागप्रमुख रोहीदास पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते अरुण नलावडे,समाधान दिसले, किरण हाडप, नवज्योत पिंगळे,सागर पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, गौरव दिसले, अजय पिंगळे, सुधीर पिंगळे, राकेश फराड, समीर हाडप आदीप्रमुख उपस्थित होते.

घोडीवली फाटा मार्गे नावंढे, केळवली, वणी, बीड, जांबरुंग, खरवई, डोळवली या रस्त्याची अवस्था पावसाळ्यात अत्यंत बिकट झाली असून या मार्गावरुन अनेक शाळकरी विद्यार्थी व नागरिक, चाकरमानी दररोज प्रवास करीत असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ पाहायला मिळत असल्यामुळे या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन मोटार सायकल चालकाच्या गाड्या या रस्त्यावरून घसरून वाहन चालकांना दुखापत होत असल्याने त्याच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर रस्त्यावर आताच्या घडीला काही ठिकाणी डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत असताना ही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या प्रशासनाला जागे करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व पक्षीय नेते व ग्रामस्थांनी एकत्र येत 26 जुलै 2022 रोजी खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस ठाण्याला निवेदन देत या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली असून जर काम त्वरित सुरू न केल्यास 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषण करणार असल्याने माहिती निवृत्ती पिंगळे यांनी दिली आहे

घोडीवली फाटा मार्गे नावंढे, केळवली, वणी, बीड, जांबरुंग, खरवई, डोळवली रस्त्याची अवस्था सध्या घडीला ‘रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता’ अशी बनल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणे सर्वांना कठीण बनल्याने संबंधित प्रशासनाने याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, जेणेकरून सर्वानचा प्रवास सुखकर बनेल असे प्रतिपादन
हनुमंत पिंगळे यांनी केले तर या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य व मोऱ्यांना पडलेले भगदाड याने दररोज कुठेना कुठे तरी अपघात घडत असल्याने या अपघाताला आळा बसावा आणि सर्वाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पंचक्रोशीतील सर्व पक्षीय नेते व ग्रामस्थांच्या वतीने खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस ठाणे यांना निवेदन दिले असून या निवेदनातून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच या रस्त्याची दुरुस्ती लवकर न झाल्यास 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषण खालापूर तहसील कार्यालयासमोर करणार आहोत असे निवृत्ती पिंगळे यांनी स्पष्ट केले आहे.