कर्जत । नाताळ आणि नववर्षा साठी माथेरान सज्ज झाले असून बहुतेक हॉटेल विद्युत रोषणाई ने नटलेली पहावयास दिसत आहेत. नगरपालिकेच्या प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर खास विद्युत रोषणाई केल्या मुळे रात्री पर्यटकांनचे लक्ष वेधून घेत आहे. हॉटेल प्रिती मध्ये सांताक्लोजचे चलचित्र लावल्याने पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे त्यामूळे पर्यटकांना सेफी घेण्याचा मोह आवरता येत नाही. नववर्षा साठी पर्यटक माथेरानला मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार असल्याचे हॉटेल चालक प्रसाद सावंत यांनी सांगितले तर आमच्या हॉटेलमध्ये पर्यटकांनी अगोदरच बुकींग केले आहे. महागाई जरी वाढली असली तरी हॉटेलच्या दरात जास्त वाढ केलेली नाही. ३१ डिसेंबर रोजी खास मेनूचे आयोजन केले असून पर्यटकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहे, तर घरगुती लॉजिग व्यवसाय करणाऱ्या अश्विनी मोरे म्हणाल्या की आम्ही या वर्षी पर्यटकां साठी खास मांसाहारी मराठमोळा मेनु ठेवला आहे. त्याला अस्सल मराठी चव असणार असून पर्यटक नक्कीच खाऊन तृप्त होतील. एकंदरीत माथेरान पर्यटकांसाठी ख्रिसमस आणि नविन वर्षासाठी सज्ज झाले आहे.