फायटर कोंबड्यांच्या झुंजीच्या जुगारावर छापा..34 जणांना अटक

0
548

पत्रकार परिषदेत रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली माहिती…

खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तेज फार्म हाऊस येथे कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांची खात्रीशीर माहिती पोलिस अधीक्षक,अलिबाग सोमनाथ घारगे यांना गोपनीय बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करून छापा टाकण्याबाबत सूचना दिल्या असता तेज फार्म हाऊस,खोपोली येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी कोंबड्यांच्या पायांना धारदार हत्यार लावून आपापसात झुंज लावून त्यावर सट्टा लावताना दिसून आले. नमूद ठिकाणावरून 34 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 334/2022 प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत हे नियम 1960 चे कलम 11 (ड) चा (द) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 12(ब) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) भारतीय दंड विधान संविधान कलम 34 अन्वये दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपींकडून 4,31,195 रुपये रोख रक्कम,18,700 त्याची अवैद्य दारू, 666,90,000 रुपये किमतीची 24 वाहने तसेच 76 फायटर कोंबड्या असा एकूण 71,78,195 त्याचा माल गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आलेला आहे.