संपूर्ण नाव – डॉ.शेखर तुळसीदास जांभळे
पत्ता – ए-३६, माधव रेसिडेन्सी, प.पु.गगनगिरी महाराज आश्रम मार्ग, खोपोली, ता.खालापूर, जि.रायगड, महाराष्ट्र – ४१०२०३
जन्मतारीख – ०२ एप्रिल १९७७
शिक्षण – बी.ए.
व्यवसाय – स्वत:चा उद्योग .
भूषवलेली पदे – अध्यक्ष : Rotaract Club Of Khopoli (२००३-२००४).
अध्यक्ष : Lions Club Of Khopoli (२०१५-२०१६).
*संस्थापक अध्यक्ष:सहज सेवा फाउंडेशन खोपोली*
सदस्य : वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ, खोपोली.
संस्थापक सचिव : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिकसंस्था, रायगड
पुरस्कार – Rotaract Club Of Khopoli तर्फे उत्कृष्ट प्रोजेक्ट चेअरमन, उत्कृष्ट प्रोजेक्ट, उत्कृष्ट रोट्कट ऑफ दी इयर सन्मानित.
बूज लाफ्टर क्लब ऑफ खोपोलीचा समाज सेवा पुरस्कार . सोमजाई मित्र मंडळाचा – समाज सेवा पुरस्कार .
खालापुर तालूका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचा समाज सेवा पुरस्कार. वेध सह्याद्री या रायगडातील संस्थेचा – जिजाऊ पुरस्कार .
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस – जीभेखालून पाण्याच्या कारंज्या काढणे. राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार – २०१७ – भावना बहुउद्देशीय संस्था नाशिक .
समाजमित्र पुरस्कार – काशी होम्स आणि सार्वजनिक दही हंडी उत्सव,खोपोली. आर्यन कोयना मित्र पुरस्कार, आर्यन फेन्डस फाउंडेशन-रायगड.
१२ नोव्हेंबर २०१७ – दिल्ली येथे १०० जगभरातील रेकॉर्डस केलेल्या रेकॉर्ड होल्डरचा सत्कार.या अनुषंगाने १६ जानेवारी २०१६ रोजी केलेल्या उपक्रमाबद्दल सत्कार.
१९ नोव्हेंबर २०१७ – समाजा प्रती उत्कृष्ट काम केल्याची नोंद घेऊन भावना बहुउद्देशीय संस्था,नाशिक यांच्यातर्फे राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन १९ नोव्हेंबर २०१७ रोजी गौरविण्यात आले.
२५ नोव्हेंबर २०१८ – समाजात शिक्षणाप्रती उपक्रम लाबविल्याची नोंद घेऊन लातूर येथे श्री.संत शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्था, लातूर यांच्या तर्फे महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सन्मानित.
युवा शक्ती सामाजिक संस्था नाशिक व बहुउद्देशीय संस्था ,नाशिक यांच्या तर्फे समतारत्न व समाजरत्न २०१८ पुरस्कारसाठी अभिनंदन प्राप्त.
खालापुर तहसील प्रमाणपत्र – अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थाच्या सामाजिक कार्याबाबत.
खोपोली पोलीस प्रमाणपत्र – खोपोली व परिसरात व्यक्तिश: समाजसेवेसाठी पर्यायी व्यवस्था स्वरूप कार्यरत आणि खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत अपघातामध्ये उद्भवणाऱ्या कठीण प्रसंगाच्या समयी तत्पर सेवेसाठी देखील हिरीरीने भाग घेऊन सामाजिक कार्यासाठी योगदान देत असल्याने पोलिसांकडून प्रमाणपत्र.
कर्जत तहसील प्रमाणपत्र – कर्जत तालुक्यातील अपघातग्रस्तांना वेळीच तातडीने मदतीचा हात देऊन जे सामाजिक कार्य करीत आहोत त्याबद्दल कर्जत तहसील प्रमाणपत्र.
महाराष्ट्र शासन महसूल विभाग प्रमाणपत्र, पेण – पेण तालुक्यात अचानकपणे आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे कार्य करून सामाजिक बांधिलकी दाखिवली त्या योगदानाबद्दल प्रमाणपत्र.
खोपोली नगरपरिषद प्रमाणपत्र – मौजे महड, ता.खालापुर, जि.रायगड येथे अन्न विषबाधा प्रकरणात शासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य केल्या बद्दल हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित.
१३ मे २०१८ – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावी कटगुण,ता.खटाव, जि.सातारा येथे खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते १३ मे २०१८ रोजी महात्मा दिनानिमित्त महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार.
१ जून २०१८ रायगड पोलीस प्रमाणपत्र – दिनांक ३० मे २०१८ रोजी इसाळगड, चौक, ता.खालापुर, जि.रायगड येथे ५ ट्रेकर्स यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यशस्वी सहकार्य केले. तसेच, खालापुर पोलीस ठाणे हद्दीत अपघातामध्ये २४ तास सेवेसाठी तत्पर आहोत याबद्दल दि. १ जून २०१८ रोजी पोलीस निरीक्षक जे.ए.शेख खालापुर पोलीस ठाणे, जि.रायगड यांच्या हस्ते प्रमाणपत्र
१९ जून २०१८ खालापुर नगरपंचायत प्रमाणपत्र – मौजे महड, ता.खालापुर, जि.रायगड येथे अन्न विषबाधा प्रकरणात शासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य केल्या बद्दल दि.१९ जून २०१८ रोजी शिवानीताई संतोष जंगम यांच्या हस्ते प्रमाणपत्र.
२१ ऑक्टोंबर २०१८ – जनसेवा गौरव पुरस्कार – जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचत गट, पुणे या संस्थेच्या वतीने २१ ऑक्टोंबर २०१८ रोजी सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पुणे येथे पुरस्कार.
१२ नोव्हेंबर २०१८ महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग प्रमाणपत्र खालापुर – खालापुर तालुक्यात अंतर्गत विशेषतः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी अपघातामध्ये उद्भवणाऱ्या कठीण प्रसंगाचे समयी तत्पर सेवेसाठी देखील हिरीरीने भाग घेऊन सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहोत यासाठी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी खालापुर येथे तहसीलदार खालापूर इरेश चप्पलवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र.
२९ डिसेंबर २०१८ – विध्यार्थीदशे पासून सामाजिक क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळत लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली त्याच सोबत जिल्हा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या कार्यशैलीची मोहर उमटवली आहे. २ आक्टोबर २०१५ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ३७२१ जणांना गांधींजींच्या वेशभूषेत सादर केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या उपक्रमाची नोंद झाली आहे त्याच सोबत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या सोबत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी माझ्या कार्याची दखल घेतली गेली आहे. सहज सेवा फौंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सचिव हि जबाबदारी सांभाळत आहे. या दोन्ही संस्थाकडून होणाऱ्या अभूतपूर्व कार्याचा लाभ अनेकांनी घेतलेला आहे. संस्था (रजि.)सानपाडा,नवी मुंबई यांच्या वतीने शनिवार दिनांक २९ डिसेंबर २०१८ रोजी राज्यस्तरीय सहकार मित्र पुरस्कार – २०१८ देवून गौरविण्यात आले.
विशेष कार्य – लायन्स क्लब ऑफ खोपोली २०१५-१६ अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारून वर्षभरात एकून २०१६ व २०१७-१८ वर्षासाठी ५० पेक्षा ज्यास्त समाजोपयोगी उपक्रमासाठी पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले.
२ ऑक्टोंबर २०१५ रोजी पंत पाटणकर क्रीडांगण, खोपोली येथे I Am Gandhi या अहींसा व स्वच्छता उपक्रमात ३७२१ शालेय मुलांना गांधीजींचे वेशात सादर करून समाजाला एक वेगळा संदेश देण्याचे कार्य केल्याने उपक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये झाली.
१६ जानेवारी २०१६ – रोजी एकाच दिवसात एकून२०१६ मुलांची डोळ्यांची तपासणी.या उपक्रमाची नोंद Asia Book Of Record India Book Of Record मध्ये….याच वर्षा सामुदायीक आदिवासी विवाह सोहळा , पक्ष्यांसाठी पाणपोई ,मुलामुलींसाठी लैंगिक शिक्षणाचे आयोजन, समाज जागृतीसाठी विविध रैलीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेसोबत काम व समाज प्रबोधन कार्यक्रम. आदिवासींना कपडे व सायकल वाटप, रिक्षावाल्याला “ए रिक्षावाले” म्हणू नका,”ओ रिक्षावाले म्हणा” या संदेशाचे प्रसारण.विक्रमी संख्येने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्राक्रिया शिबीर, थालोमिया या वैदयेकीय प्रकल्पाचे आयोजन, पर्यावरणास आवश्यक अशा वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन.खोपोली नगरपालिका रुग्णालयात कायम स्वरूपी रक्त पेढीचे निर्माण केले ती के.एम.सी. व लायन्स कल्बच्या माध्यमातून अविरत सेवेत आहे.होळीच्या दिवशी वृक्षाची कत्ल होते ती रोखण्यासाठी ६५ कडूलिंबाची झाडांची लागवड. वेंकुंट स्मशान भूमी शिळफाटा येथे ४० वृक्षांची लागवड केली.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी बँगचे वाटप केले.“बेटी बचाओ” मुद्द्यावर समाजाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शाळेतील मुलींच्या माध्यमातून “पाठमोरया दिशेने चालणे” या आगळ्या वेगळ्या रेंलीचे आयोजन.गर्भवती महिलांसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.खोपोली पोलीस स्टेशनमध्ये Water Purifier चे वाटप.शाळेतील मुलांना अवकाशाचे ज्ञान प्राप्त व्हावे या उददेशाने वैज्ञानिकांच्या मदतीने आकाशगंगा ओळख कार्यक्रमाचे आयोजन.समाजातील प्रत्येक जन तंदुरुस्त असावा या दृष्टीने योग कॅम्पचे वेळोवेळी आयोजन.रात्रीचे अपघात रोखण्यासाठी म्हशी व गाईंच्या शिंगाना रेडियम चिकटविण्याचे काम.मतीमंद मुलांना गरजेच्या साहित्याचे वाटप व प्रौढासाठी शिक्षण शिबिरांचे आयोजन .बेरोजगार व गरजू महिलांना ७२ शिलाई मशीनचे वाटप .३० डिसेंबर २०१६ रोजी सहजसेवा फाउंडेशन खोपोलीचे श्री.गुरुनाथ साठेलकर यांच्या सोबतीने नवीन सामाजिक संस्था स्थापन केली . या संस्थेच्या माध्यमातून थंडीमध्ये उघडयावर झोपणाऱ्या लोकांना ब्ल्यकेटचे वाटप करून उपक्रमाचा शुभारंभ करून नंतर “सहज माणुसकीची भिंती” चे निर्माणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गरजूंना वैद्यकीय साहित्य अर्थात वॉकर्स, बेड, स्टिल व्हीलचेअर, रुग्णांसाठी बेड, वॉटर बेड अल्प भाडयाने आणि परतीच्या बोलीवर पुरवठा योजना कार्यरत.“अपघातग्रस्त मदतीसाठी सामाजिक संस्था” या सोशियल मिडिया ग्रुपचा मेंबर या नात्याने तत्काळ सेवा देण्याचे कामातून अनेकांच्या जीवीताचे रक्षण करण्याची सेवा केली आहे.आय.एम.गांधी या उपक्रमाला मिळालेल्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसच्या नोंदीने खोपोली नगर परिषेद तर्फे सन्मानाबद्द ल मानांकीत केले गेले.
३१ डिसेंबर २०१८ – सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री खोपोली एसटी स्तंड व रेल्वेस्थानकात जाऊन गरजू व्यक्तींना ब्ल्यकेट व कानटोपीचे वाटप केले.
१ जानेवारी २०१९ – सहज अन्नदान अभियान सहजसेवा फाउंडेशन,खोपोली ही सहज सामाजिक कार्य करणारी सेवा म्हणून परिचित आहे.याच समाज सेवेच्या उदात्त कार्य करण्याच्या जाणीवेतून १ जानेवारी २०१९ रोजी पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय,खोपोली येथे ऍडमिट असणाऱ्या रुग्णांसाठी दर दिवशी दुपारचे व रात्रीचे निशुल्क जेवण (संपूर्ण शाकाहारी) उपलब्ध होत आहे. हा उपक्रम अखंडपणे राबविण्यात येणार आहे.
३ जानेवारी २०१९ – सर्व सामान्यांचे रक्षण आणि विघातक शक्तीचा नायनाट करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असते.त्याकारणाने पोलीस यंत्रणेचे दैनंदिन कामकाज कसे असते,याची ओळख व्हावी आणि सामाजिक समतोल साधत गुन्हे रोखणे व न्याय व्यवस्था राखण्यासाठी आदरयुक्त दहशत कशी निर्माण करावी लागते. यासंबंधी विस्तृत माहिती देण्यासठी खोपोली पोलीस स्टेशनच्या सभागृहात ‘रेझिंग डे’ च्यानिमित्ताने सहजसेवा फाउंडेशन,खोपोली या संस्थे मार्फत हा कार्यक्रमात आयोजन केले.
८ फेब्रुवारी २०१९ – खोपोली शहर मुंबई–पुणे या दोहोंच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मुंबईपासून रेल्वेची थेट सेवा असल्याने कामानिमित्त व इतर कामांकरिता आणि इतर कारणांकरिता येणार्यांची संख्या हजारोंची आहे.याच शहरात रेल्वे व अन्य माध्यमातून मानसिक संतुलन बिघडलेली आणि वेडसर व्यक्तीही येत असतात.अशा व्यक्तींची अस्वच्छता व राहनीमान सर्वांनाच त्रस्त करून जाते.यातूनच रोगराई होण्याची व पसरण्याची आणि लोकांना मानसिक त्रास होण्याचे प्रमाण अधिक असते.सहजसेवा फौंडेशन अनेक सामाजिक उपक्रम करण्याबरोबर खोपोली शहरात असणाऱ्या या वेडसर व्यक्तींना स्वच्छ करण्याचा आणि खोपोलीकरांचा मानसिक त्रास कमी करण्याचा उपक्रम हाती घेण्याचे ठरिवले आहे. याचीच सुरवात श्रीगणेश जयंतीच्या निमित्ताने करण्यात आली आहे. दिनांक ८ फेब्रुवारी पासून ते दिनांक २७ मार्च २०१९ पर्यंत १३ मनोरुग्णांना या मनोरुग्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत सेवा पुरविण्यात आली. हा उपक्रम अखंडपणे राबविण्यात येणार आहे
– शेखर तुळशीदास जांभळे .