अंधाराचा फायदा घेवून घरफोडी करणाऱ्या दोंघांच्या खोपोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
खोपोली…
खोपोली पोलीस हद्दीत दिनांक 19 जुलै 2022 रोजी राज इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल दुकानात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शटरचे कुलूप तोडून पाच मोबाईल चोरून दोन इसम पसार झाले होते.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक राकेश कदम व डीबी टीम यांना तपास करण्यासाठी आदेशित केले..
सदर घटनेच्या अनुषंगाने घटना घडलेल्या रात्रीच्या वेळेतील रेल्वे स्टेशन परिसरातील सी.सी.टीव्ही कॅमेरे शहरातील बाहेर जाणाऱ्या रस्त्यालगतील कॅमेरे तसेच त्यावेळेस शहरात आलेल्या संशयास्पद वाहन या सर्वांची तपासणी सुरू केली व माहिती घेण्यास सुरुवात केली त्यादरम्यान घरपोडी करणाऱ्या दोन इसमांची अस्पष्ट छायाचित्रे समोर आली त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधार व गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या पर्याप्त माहितीवरून दिनांक 06 ऑगस्ट 2022 रोजी घरपोडी करणाऱ्या दोन चोरट्यांचा शोध घेण्यात खोपोली पोलिसांना यश आले.
सदर गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एक आरोपीत हा मर्डरच्या गुन्ह्यात बारा वर्षे शिक्षा भोगलेला असून दुसरा आरोपीत हा मर्डरच्या गुन्ह्यात तब्बल 20 वर्ष शिक्षा भोगून 2021 मध्ये बाहेर आलेला आहे.
अशा आरोपींना अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने ताब्यात घेण्यात टीमला यश आले आहे.
खोपोली पोलीस स्टेशनचे निरिक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम,पोह/1086 प्रसाद पाटील,पोशि/1849 प्रदिप खरात,पोशि/456 रामा मासाळ,
पोशि/590 दत्ता नुलके,पोशि/1438 स्वागत तांबे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
पुढील तपास सपोनि राकेश कदम हे करीत आहेत…