जिल्हा बुद्धिबळ संघटना ह्यांच्या सहकार्याने, लायन्स क्लब ऑफ मांडवा आयोजित, लायन संदीप म्हात्रे पुरस्कृत बुद्धिबळ स्पर्धा झिराड येथे संपन्न
अलिबाग
रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना ह्यांच्या सहकार्याने, लायन्स क्लब ऑफ मांडवा आयोजित, लायन संदीप म्हात्रे पुरस्कृत बुद्धिबळ स्पर्धा तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाज मंदिर, झिराड,अलिबाग येथे संपन्न झाली.

सदर स्पर्धेचे उद्घाटन अलिबाग मुरूड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांचे हस्ते आणि रायगड जिल्हा परिषद ,समाज कल्याण सभापती माजी दिलीप भोईर व रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे ,आणि लायन्स क्लब मांडवा अध्यक्ष मोहन पाटील आणि पुरस्कर्ते ल.संदीप म्हात्रे यांच्या उपस्थित उद्धघटन दीप प्रज्वलित केले.

सिनकर यांचे सुंदर इशस्तवन गीताने आणि बुद्धिबळाच्या पटावर खेळी करून स्पर्धेची सुरवात झाली. सदर स्पर्धेत अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर, पनवेल,उरण,रोहा, मुरुड येथील बक्षीस वितरण समारंभ रायगड जिल्हा परिषद , समाजकल्याण सभापती मा. दिलीप भोईर यांचे हस्ते पार पडला.

या वेळी, लायन्स क्लब मांडवा चे अध्यक्ष ला. मोहन पाटील , पुरस्कर्ते ला.संदीप म्हात्रे, रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष विलास म्हात्रे, नंदकुमार पालवे, राज्य पंच ,आणि स्पर्धा समन्वयक सुशील गुरव, ला. नितीन अधिकारी, ला. अमिश शिरगावकर, ला. धवल राऊत,ला.सुबोध राऊत, ला. बी एन कोळी,ला. विलास पाटील, ला. अमरेश शिरगावकर,ला. सुमित पाटील,ला. विद्या अधिकारी, ला. निकिता पाटील,ला. डॉ राजाराम हुलवान, ला. अश्विनी हुलवान,ला. पंकज केसरकर, ला. चंद्रकांत मल्हार,ला. अभिजित गुरव,ला. सतीश म्हात्रे ला. हर्षद पाटील ,ला. डॉ. राजेंद्र मोकल उपस्थित होते

सदर स्पर्धेमध्ये खुल्या गटात प्रथम क्रमांक- सन्मिल गुरव ( अपराजित,6/6) रु.2000/- आणि ट्रॉफी.
द्वितीय क्रमांक अविष्कार मरभल ₹१५००/- आणि ट्रॉफी (5/6),
तृतीय क्रमांक – शुभम नांदगावकर (5/6) ₹१०००/- अणि ट्रॉफी,
चतुर्थ क्रमांक- साई बलकवडे ( 5/6) ₹ ५००/- आणि ट्रॉफी ,
पाचवा क्रमांक- अभिषेक ई (5/6 ),
तसेच उत्तेजनार्थ अभिजित गुरव आणि सोफिया घट्टे ( महिला विशेष बक्षीस) यांनी चमकदार कामगिरी केली.
तर पंधरा वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक शंतनु पेंडसे ( 4/4) १५००/- आणि ट्रॉफी,
द्वितीय क्रमांक निमिष वाकडे ( 3/4) रू. १०००/- आणि ट्रॉफी,
तृतीय क्रमांक – प्रथमेश जामगे (3/4) ५००/- आणि ट्रॉफी ,
तेरा वर्षा खालील गटात
प्रथम क्रमांक – अपेक्षा मारभल (5.5/6 अपराजित )1000/- आणि ट्रॉफी,
द्वितीय क्रमांक – अथर्व वाघ ( 5/6) ७००/- आणि ट्रॉफी ,
तृतीय क्रमांक- आरोही पाटील ( 5/6) ५००/- आणि ट्रॉफी ,
उतेजनार्थ – अनुष्री गुरव (3/5) आणि रिद्धी शेडगे – (2/6, सर्वात लहान मुलगी 4 वर्ष) यांनी त्यांच्या गटात चमकदार कामगिरी केली.





















