खोपोली शहरात शाळा कॉलेजच्या बाहेर रोड रोमियोंचे प्रमाण वाढले आहे.अनेक ठिकाणी शाळा कॉलेज सुटल्यावर आपापसात भांडण होणे या प्रकारात वाढ झालेली आहे. पालकांच्या विविध तक्रारी नंतर खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी थेट कारवाई केली. विद्यालयाच्या आवारात फिरणाऱ्या बऱ्याच जणांना समज देवून सोडण्यात आले.पोलिसांच्या अचानक कारवाईने विनाकारण रस्त्यावर फिरणारे पळून जाताना दिसत होते यावेळी शहरातील गार्डन व कॅफे याठिकाणी देखील तपासणी करण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून बेलगाम असणाऱ्या रोड रोमियोंवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असा सुर नागरिकांमधून पहावयास मिळत आहे.
खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या समवेत सागर पडधान, स्वागत तांबे,ज्योती हंबिर तसेच खोपोली वाहतूक शाखेचे संजय सताने,राहुल कोरडे यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.