अभि युवा ग्रुप देवन्हावे यांच्या वतीने श्री शिव छत्रपती विद्यालय देवन्हावे या विद्यालयातील 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप केल्या असून यामध्ये 25 स्कुल बॅग तसेच 50 कंपास पेटी असे विविध साहित्य साधारण 60 ते 70 विद्यार्थ्यांना वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला असून अभि युवा ग्रुप देवन्हावे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे, तर याप्रसंगी खोपोली पोलीस निरीक्षक शिरिष पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी खोपोली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक शिरिष पवार, माजी पं.स.सभापती श्रध्दा साखरे, शालेय समिती अध्यक्ष भास्कर लांडगे, सहजसेवा फाऊंडेशन संस्थापक डॉ.शेखर जांभळे, मुख्याध्यापिका विना देशपांडे, खोपोलीचे माजी नगरसेवक अविनाश तावडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत केदारी, अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी ग्रुपचे हनिफ करंजीकर – विजय भोसले, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद तावडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर चौधरी, अँड.जयेश तावडे, अँड.भगवान लाले, अँड.मयूर कांबळे, ग्रामसेवक काळे, अभि युवा ग्रुपचे ओकार वाणी, राज पाटील, अतिष पाटील, देवेश तावडे, गणेश चौधरी, ऋतुजा तावडे आदीप्रमुखासह मोठ्या विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी खोपोली पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जीवन जगत असताना प्रत्येकाने समाजातील गरजू घटकांना मदत केली पाहिजे व विविध उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन पोलीस निरीक्षक पवार यांनी केले तसेच शालेय समिती अध्यक्ष भास्कर लांडगे यांनी अभि युवा ग्रुप व अँड.जयेश तावडे यांचा शाळेच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे वेळोवेळी सामाजिक कार्यातून मदत केली जाते यांची माहिती देत सर्व ग्रुपचे आभार मानले असून खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे यांनी आपले विचार मांडताना विद्यार्थ्यांना अनेक संदेश दिले असता यामध्ये अँड.जयेश तावडे व राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष तथा देवन्हावे सरपंच अंकित साखरे यांनी याच शाळेत शिक्षणाचे धडे गिरवून उच्च पदाला गवसणी घातली त्यामुळे तुम्हीही चांगल्याप्रकारे अभ्यास करून आपले ध्येय साध्य करित समाजासाठी काम करा, असे मत सौ.साखरे व्यक्त केले.
तसेच सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ.शेखर जांभळे यांनी अभि युवा ग्रुपचे सर्व सदस्य हे आपल्या अभि व रोहित मित्रांच्या नावाने विविध सामाजिक कार्यक्रम करून एक सच्ची दोस्ती मैत्री निभावत सामाजिक बांधीलकी जपत असल्याने त्यांच्या उपक्रमातून अनेकांना वेगवेगळ्या रुपाने मदत होत आहे.