मोहोपाडा येथील ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बाळकृष्ण राऊत,तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मोहोपाडा येथील मरिआई मंदिराच्या सभामंडपात शुक्रवार दि.26 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यात आले होते.या शिबिराला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते श्री गणेशाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.या शिबिरात 125 जणांची नेत्रतपासणी करण्यात आली तर रक्तदाब, रक्तशर्करा 165 नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्याचबरोबर हृदयाची शस्त्रक्रिया, अन्ननलिका,हाडांचे फ्रेक्चर, कॅन्सर,कान,नाक शस्त्रक्रिया,श्वसन नलिका संबंधित शस्त्रक्रिया, मणक्यांच्या शस्त्रक्रिया,डोळ्यांचा तिरलेपणा,किडणीचे आजार आदीत वीस नागरिकांना त्रास असल्याचे तपासणीत दिसून आले.त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर , शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, विभागप्रमुख अजित सावंत,माजी सभापती रमेश पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे,माजी सरपंच रोशन राऊत, माजी सरपंच संदिप मुंढे,माजी सरपंच कृष्णा पारंगे, माजी सरपंच शशिकांत मुकादम, माजी सरपंच भाग्यश्री पवार, माजी उपसरपंच राकेश खारकर,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील,माजी नगरसेवक सुनील गोगटे,समीर म्हात्रे,मंगेश पाटील,शंकर भोईर ,केदार भोईर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी केले.