कर्जत । जिल्हा परिषद आणि नगररचना विभाग यांच्या माध्यमातून १५ वर्षांपूर्वी नेरळ विकास संकुल प्राधिकरण स्थापन करण्यात आले. त्या प्राधिकरण हद्दीमधील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नवीन वसाहत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागातील रहिवासी ममदापूर नवीन वसाहत भागातून प्रवास करताना खड्ड्यांमुळे त्रस्त होत आहेत. कर्जत तालुक्यातील नेरळ, कोल्हारे आणि ममदापूर वा तीन ग्रामपंचायती मिळून नेरळ विकास संकुल प्राधिकरण स्थापन करण्यात अगले होते. प्राधिकरण स्थापन काढताना रस्त्यांचे तसेच अनधिकृत बांधकाम होणार नाही याची काळजी पालीतील दुषित पाणी समस्या; राजेश मपारा घेणार मुख्यमंत्र्यांची भेट बोधकथा घेण्यासाठी नगररचना विभाग आणि रायगड जिल्हा परिषद यांनी नेरळ विकास प्राधिकरण स्थापन केले आहे.
या प्राधिकरणमध्ये जमणाऱ्या निधीमधून रस्त्यांची तसेच गटारे, गार्डन विकसित करण्याची कामे केली जात आहेत. त्याचवेळी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निपी उपलब्ध करून देण्याचे काम प्राधिकरणकरीत आहे. ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत प्राधिकरणकडून विकास कामे करण्याबाबत सावळागोंधळ सुरु आहे. या भागात २०० हुन अधिक इमारती उभ्या असून त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना खडेमय रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. ममदापूर भागातील काही रस्त्यांची कामे नेरळ विकास संकुल प्राधिकरणमधून१० वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती. त्यावेळी डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली होती आणि त्यामुळे आता त्या रस्त्यावर पूर्वी डांबरीकरण झाले होते काय? हे शोधण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.