जन्म. १५ जुलै १९२७ सातारा येथील कलेढोण येथे
प्राचार्य भोसले यांनी विविध स्वरुपाचे लेखन केले. दीपस्तंभ, यक्षप्रश्न, महायोगी अरविंद चरित्र, जागर खंड एक व दोन इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. महाराष्ट्रासह न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, सिंगापूर येथे त्यांनी व्याख्याने दिली आहेत. अत्यंत ओघवती भाषाशैली हा त्यांच्या वक्तृत्वाचा विशेष गुण म्हणता येईल.
फर्डे वक्ते म्हणून ख्याती असलेले साहित्यिक, विचारवंत शिवाजीराव भोसले यांचे वडील अनंतराव भोसले प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते. घरात पाच मुलं आणि वडील शिक्षक अशा परिस्थितीत संकटातून मार्ग काढत शिवाजीरावांनी शिक्षण सुरू ठेवले. पुढे त्यांचे ज्येष्ठ बंधू स्थिरावले. याच सुमारास जात्याच बुद्धीमान असलेल्या शिवाजीरावांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी कमवा आणि शिका योजनेतून उच्च शिक्षण घेतले. आयएलएस कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. काही काळ साता-यात वकिली केली. ते १९५७ पासून फलटण येथील मुधोजी कॉलेजमध्ये रुजू झाले. तिथून पुढे सलग २५ वर्षे शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. मोठे बंधू बाबासाहेब हे काही काळ राज्याचे मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या इतरांशी असलेली वागणूक अतिशय चांगली होती.
कायम जमीनीवर पाय ठेवून असलेल्या शिवाजीरावांनी शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकापासून प्राचार्यापर्यंत अनेक जबाबदा-या पार पाडल्या. १९६३ मध्ये शिवाजीराव मुधोजी कॉलेजचे प्राचार्य झाले. त्यानंतर १९८८ ते १९९१ दरम्यान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदाचे काम पाहिले.
शिवाजीराव भोसले यांची महाराष्ट्राला प्रसिध्द लेखक आणि तितकेच प्रसिध्द वक्ते अशी ओळख होती. त्यामुळेच प्राचार्य भोसले यांचे व्याख्यान म्हटले, की कोणत्याही शहरातील कोणतेही सभागृह श्रोत्यांनी ओसंडून वाहत असे. योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, मराठी संत, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय समाजसुधारक, पुणे, भारतीय तत्वज्ञ, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य या विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान देणे, ही त्यांची हातोटी होती. त्यांनी पुणे आकाशवाणी, वसंत व्याख्यानमाला, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला, विवेकानंद शिला स्मारक समिती व्ख्यानमाला यांच्यासह देशाविदेशात विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. त्यांनी लिहिलेली दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर (खंड १ आणि २), प्रेरणा, हितगोष्टी ही पुस्तकं प्रचंड गाजली आहे. एक सुप्रसिद्ध व्याख्याते होते. भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी संत, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य इत्यादी विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्याख्यान देत असत. शिवाजीराव भोसले यांचे २९ जून २०१० रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून शिवाजीराव भोसले यांना आदरांजली.





















