चौक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट घटना दिली,ते जगातील सर्वोच्च व्यक्ती आहेत. जगभरात बाबासाहेबांचे सर्वाधिक स्मारक असून जगातील १२४ देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. असे वर्णन प्रशासक तथा विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल यांनी केले.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले गरिबीतून, हलाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले.हा त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे जीवनकार्य सर्वांनी अभ्यासले पाहिजे.तीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असेही प्रतिपादन त्यांनी  केले.

 

ग्रुप ग्रामपंचायत चौक,ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव, ग्रुप ग्रामपंचायत आसरे,ग्रुप ग्रामपंचायत लोधीवली, ग्रुप ग्रामपंचायत कलोते,ग्रुप ग्रामपंचायत वावर्ले व ग्रामपंचायत वावंढळ यांच्यावतीने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.पी.जाधव,संतोष पवार,भाऊसाहेब गोलार,निलेश म्हसकर,संजय पोळ,संभाजी केंद्रे,सचिन कुराडे,ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत सफाई, पाणीपुरवठा कर्मचारी यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले