त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठ व गुरू माऊली अण्णासाहेब मोरे यांची बदनामी केल्याबाबत रायगड पोलीस अधीक्षक यांच्याकडे कारवाई करण्यासंदर्भात निवेदन सादर
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ मार्गाचे काम हे परमपूज्य मोरे दादाव त्यांनतर सर्व सेवेकऱ्यांचे आधारस्तंभ असलेले परमपूज्य गुरू माऊली यांच्या माध्यमातून 74 वर्षांपासून अविरहित चालू असताना सुद्धा शिवाजी नगर पुणे येथील अमर रघुनाथ पाटील व त्र्यंबकेश्वर येथील चंद्रकांत गणपत पाठक यांनी बदनामी केल्याबाबत रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे कारवाई करण्यासंदर्भात कोकण विभागाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ परमपूज्य मोरे दादा व त्यांनतर सर्व सेवेकऱ्यांचे आधारस्तंभ असलेले परमपूज्य गुरू माऊली यांच्या माध्यमातून 74 वर्षांपासून अविरहित सुरू आहे.सदर निअस हा कायदेशीर रित्या त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असून त्याचे कामकाज हे अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे.
सदर संस्थेचे सामाजिक,अध्यात्मिक, धार्मिक स्तरावर लोकहिताची कामे केली जात असतानाच श्री स्वामी समर्थ मार्गाचे शेती विषयक मन जागरण व मार्गदर्शन ही केले जात आहे.त्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली हे भारतसहित जगात लोक प्रबोधन साठी मेळावे घेत असतात.त्यामुळे श्री स्वामी समर्थ मार्गासाठी देशविदेशातील लाखो सेवेकरी जोडले आहेत.सदर सेवा मार्गास व्यापक स्वरूप देऊन देशविदेशात शेकडो सेवा केंद्र उभारलेली आहेत.सदर सेवाकेंद्रात बाळ संस्कार,युवा प्रबोधन, स्वयंरोजगार, विना हुंडा सामूहिक विवाह, प्रश्नोत्तरे सेवा ,व्यसन मुक्ती, शेतकऱ्यासाठी कृषी मेळावे,शेतकरी सतसंग मेळावे,दुष्काळात गुरांना चारा, पाण्याचे टाक्याचे वाटप,सहित अन्य जनहित कल्याणकारी योजनांचा कोट्यवधी जनता लाभ घेत आहेत.तसेच श्री स्वामी समर्थ मार्गाने कोव्हिडं19 काळात लाखो गरजूंना अन्नदान तसेच महाराष्ट्र शासनास सेवेकरी निवासस्थान विलीगिकरणासाठी निशुल्क उपलब्ध करून देण्यात आले.अशाप्रकारे शासनाही मदत करण्याचा व शासनाच्या काम करण्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे कार्य केले जात आहे.
असे असताना अमर रघुनाथ पाटील(राहणार-करणं लँडमार्क,प्लॉट नं.15,भावकर लेन ,शिवाजी नगर,पुणे)व चंद्रकांत गणपत पाठक(टेलिफोन एक्सचेंज च्या मागे,पाच आळी, त्रंबकेश्वर, जिल्हा-नाशिक )यांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता वैयक्तिक स्वार्थासाठी खोटे अर्ज करून खोट्या अर्जावरून त्रंबकेश्वर येथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे सुमारे पन्नास कोटी रुपयांचा अपहार झाला असल्याची आदिवासी जमिनीबाबत व बांधकामाबाबत जे काही बेकायदेशीर वक्तव्य केली आहेत.त्यामुळे श्री स्वामी समर्थ परिवारातील सेवेकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होऊन संतप्त रोष निर्माण झाला आहे.
समस्त सेवेकरी यांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य गुरु माऊली व मार्ग यांची बदनामी करून जनमाणसांत चुकीचा संदेश पसरवून समाजात व सेवेकरी यांच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.तरी तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तिविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन किहीम ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गायकवाड यांच्यासाहित अन्य सेवेकरी यांनी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना सादर केले आहे.