अलिबाग

रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असे आपण मानतो. त्यामुळे रक्तदान हे समाजसेवेचच एक मोठं काम आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. कोणाला काहीतरी देण ही आजच्या घडीला खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातही रक्तदान करणे ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे असे प्रतिपादन श्रीयश हॉस्पिटल व मुरुड महादेव कोळीवाडा,कच्छ युवक संघ पेण आणि शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमातून रक्तदान शिबीराच्या उद्धाटन प्रसंगी माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश पाटील हे बोलत होते.

आजच्या रक्तदान शिबीरातही मुरुड-राजपुरी कोळीवाड्यातील तरुण व महिलांचा स्वतःच्या मर्जीने आणि उत्स्फूर्त आणि अखंड सहभाग हे या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य आज दिसून आले. एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदानासाठी तरुण तरुणी व महिला रक्तदान करतात हे महादेव कोळी समाजाचे फार मोठ यश असुन त्याबरोबर राजपुरी येथील- नरेश गिदी यांचे मोठे योगदान लाभल्यामुळे आज रक्तदान विक्रमी नोंद करू शकलो असे प्रतिपादन माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश पाटील यांनी केले.

श्रीयश हॉस्पिटल व महादेव कोळीसमाज कोळीवाडा मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.मकबुल कोकाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तर मुरुड महादेव कोळीवाडा समाजाचे अध्यक्ष-मनोहर बैले यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या नियोजनबद्ध आणि भव्य रक्तदान शिबीरात विक्रमी २३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबीराचे उद्घाटक- डॉ. मकबुल कोकाटे, डॉक्टर- मंगेश पाटील, चिंतामणी मकु, अंजली पाटील, कच्छ युवक संघ पेण अध्यक्ष-धनेश शहा ,विजय सुर्वे,डाॅ.इप्सित पाटील,डॉ. आदित्य पाटील ,संदिप पांगे,माजी नगराध्यक्षा- स्नेहा पाटील, डॉक्टर किशोर बडगुजर, डॉक्टर- राजेश पाटील, डॉक्टर- हेमकांत सोनार, डॉक्टर-पुनम पाटील,प्रशांत तुरुरे,ललीत पाटील,दिपक मोकल,ऋतुजा पाटील,निकिता चोरडेकर, जितेंद्र मकु, चेतन मकू,माजी नगराध्यक्ष-मंगेश दांडेकर, संदिप पाटील, किर्ती शहा, अजित गुरव,आशिष दिवेकर,नरेश गिदी,विजय गिदी,उल्हास मकु,ऋत्विज मकु, सुरेंद्र मकु,उमेश पाटील,गजानन पाटील,शेगजी,अविनाश दांडेकर,महेश घाडगे,बाळकृष्ण गोंजी,प्रकाश गोंजी ,शुभांगी थळे, शिवाजी थळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, नूतन नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी, पाटील हॉटेलचे देवाभाई आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

यावेळी डॉ.मंगेश पाटील व मान्यवरांच्या शुभ हस्ते रक्तदान करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक बॅग , किचन, सर्टिफिकेट व इन्स्टंट फोटो सोबत भेट देण्यात आले.

चिंतामणी मकू आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,आज श्री हनुमान जन्मोत्सव असुन आजच्या या सोनेरी दिवशी सर्वानी रक्तदान करून रेकाॅर्ड ब्रेक रक्तदान केले आहे.

यांचे श्रेय राजपुरी कोळीवाड्यातील महिला -पुरुष व तरुणांचे आहे.तुम्ही केलेल्या रक्तदानमुळे रुग्णाला जीवनदान मिळु शकते.

व त्यातच आपल्याला दुस-याचे प्राण वाचविण्याचे समाधान व समाजाचे ऋण फेडण्याचा आनंद मिळणार आहे.रक्तदान करुन विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लावुन मोलाचे कार्य करुया रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.

सदरील रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळून २३९ बॉटल रक्त संकलित करण्यात आले आहे.. सदर शिबीराच्या यशस्वीतेसाठी श्री साई रक्त सेन्टर पनवेल,कच्छ युवक संघ पेण,आणि शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय अलिबाग
यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रल्हाद गोंजी व चेतन मकू यांनी केले.