कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या नलिनी नथुराम कारंदे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी कराडे खुर्द उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी प्रमिला योगेश पाटील यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरला. यानंतर दुसरा कुणाचाही अर्ज न आल्याने निवडणूक कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारती हेमंत चितळे आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक निवृत्ती एकनाथ आंधळे यांनी प्रमिला योगेश पाटील यांच्या नावाची बिनविरोध उपसरपंच निवड झाल्याचे घोषित केले.यावेळी कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून घोषणाबाजी केली.याप्रसंगी भाजपाचे अरुणशेठ भगत यांनी उपस्थित राहून प्रमिला योगेश पाटील यांना शाल ,पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी सरपंच विजय मुरकुटे,माजी सरपंच किरण माळी,राजेंद्र पाटील, ॲड.संजय टेबें, अमित जाधव, भूपेंद्र पाटील, सुनील माळी, महादेव कांबळे, योगेश पाटील, बंडू मोडक, श्रीकांत पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश पाटील, धनाजी ठोंबरे, भानुदास माळी ग्रामपंचायत सदस्य मुकेश पाटील, नितेश कारंदे, सदस्या मीनल ठोंबरे,यशश्री मुरकुटे, नलिनी कारंदे,रेवती भोईर, सदस्य संतोष म्हात्रे, माधुरी चितळे, रविंद्र चितळे,बबन पाटील, योगेश मुरकुटे आदी उपस्थित होते.नवनिर्वांचित उपसरपंच प्रमिला योगेश पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.