३ मे परशुराम_जयंती.
हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला परशुरामाची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांप्रमाणे याच दिवशी विष्णु देवाचे आवेशावतार परशुरामाचा जन्म झाला होता. महाभारतानुसार, महाराज शांतनुचे पुत्र भीष्माने परशुरामाकडून अस्त्र-शस्त्राची विद्या प्राप्त केली होती. एकदा भीष्म काशीमध्ये होणा-या स्वयंवरातून काशीराजच्या पुत्री अंबा, अंबिका आणि बालिकाला आपल्या लहान भाऊ विचित्रवीर्यसाठी उचलून आणले. तेव्हा अंबाने भीष्माला सांगितले की, तिने मनातल्या मनात राजा शाल्वला आपले पति मानले आहे. तेव्हा भीष्माने तिला ससम्मान सोडले, परंतु हरण केलेले असल्यामुळे शाल्वने अंबाला अस्वीकार केले.
तेव्हा अंबा भीष्म गुरु परशुरामाकडे पोहोचली आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. अंबाची कथा ऐकून परशुरामने भीष्माला तिच्यासोबत विवाह करण्यास सांगितले. परंतु ब्रम्हचारी असल्यामुळे भीष्माने असे करण्यास नकार दिला. तेव्हा परशुराम आणि भीष्मामध्येयुध्द झाले. शेवटी आपल्या पितरांचे ऐकून परशुरामने आपले अस्त्र ठेवले. अशा प्रकारे या युध्दात कोणाचा विजय किंवा पराभव झाला नाही.
महर्षि भृगुचे पुत्र ऋचिकचा विवाह राजा गाधिची पुत्री सत्यवतीसोबत झाला होता. विवाहानंतर सत्यवतीने आपले सासरे महर्षि भृगुला आपल्या आणि आपल्या मातेसाठी पुत्राची याचना केली. तेव्हा महर्षि भृगुने सत्यवतीला दोन फळ दिले आणि म्हटले की, ऋतु स्नानानंतर तू उंबराचे वृक्ष आणि तुझ्या आईने पिंपळाच्या वृक्षाला आलिंगन केल्यानंतर हे फळ खावे. परंतु सत्यवती आणि त्यांच्या आईने हे काम करण्यात चुक केली. ही गोष्ट महर्षि भृगुला कळाली. तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की, तु चुकीच्या वृक्षाला आलिंगन दिले आहे. यामुळे तुझा पुत्र ब्राम्हण असूनही क्षत्रिय गुणांचा असेल आणि तुझ्या आईचा पुत्र क्षत्रिय असूनही ब्राम्हणांप्रमाणे आचरण करेल.
तेव्हा सत्यवतीने महर्षि भृगुला प्रार्थना केली की, माझा पुत्र क्षत्रिय नसावा. त्याचा पुत्र असला असला तरी चालेल. परंतु महर्षि भृगुने म्हटले की, असेच होईल. काही काळानंतर जमदग्रि मुनिने सत्यवतीच्या गर्भातून जन्म घेतला. त्यांचे आचरण ऋषिंप्रमाणे होते. त्यांचा विवाह रेणुकेसोबत झाला. मुनि जमदग्रिचे चार पुत्र झाले. त्यामधील परशुराम हे चौथे होते. याच चुकीमुळे परशुरामाचा स्वभाव क्षित्रियांप्रमाणे होता. गोस्वामी तुलसीदास व्दारे रचलेल्या श्रीरामचरित मानसमध्ये वर्णन आहे की, श्रीरामाने सीता स्वयंवरात शिव धनुष्य उचलले आणि प्रत्यंचा चढवताना तो तुटला. धनुष्य तुटण्याचा आवाज ऐकून परशुरामसुध्दा तेथे आले. आपले आराध्य महादेवाचे धनुष्य तुटलेला पाहून ते खुप क्रोधित झाले आणि तेथे त्यांचे श्रीराम आणि लक्ष्मणासोबत विवाद झाला. परंतुल वाल्मीकि रामायणनुसार, सीतेच्या विवाहानंतर जेव्हा श्रीराम पुन्हा अयोध्येला आले. तेव्हा परशुराम तेथे आले आणि त्यांनी श्रीरामाला आपल्या धनुष्य चालवण्यास सांगितले. श्रीरामाने बाण धनुष्यावर चढवून सोडला. हे पाहून परशुरामाला श्रीरामाच्या वास्तविक स्वरुपाचे दर्शन झाले आणि ते तेथून निघून गेले. एकदा परशुरामाची माता रेणुका स्नान करुन आश्रमातून येत होती. तेव्हा संयोगाने राजा चित्ररथसुध्दा तेथेच जलविहार करत होते. राजाला पाहून रेणुकाच्या मनात विकार उत्पन्न झाला. त्याच अवस्थेत ती आश्रमात पोहोचली. जमदग्रिने रेणुकाला पाहून त्याच्या मनातील गोष्ट जाणुन घेतली आणि आपल्या पुत्राकडून मातेचा वध करण्यास सांगितले. परंतु मोहवश कोणीच त्यांच्या आज्ञेचे पालन केले नाही. तेव्हा परशुरामाने विचार न करता आईचे शिर कापले. हे पाहून मुनि जमदग्रि प्रसन्न झाले आणि त्यांना परशुरामाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने आपल्या आईला जिवंत करण्याचा आणि ही गोष्ट तिला माहिती हो न देण्याचे वरदान मागितले. या वरदानाचे फळ म्हणून त्यांची माता पुनर्जीवित झाली.
हिंदू धर्म ग्रंथात काही महापुरुषांचे वर्णन आहे ज्यांना आजही अमर मानले जाते. यांना अष्टचिरंजीवीसुध्दा म्हटले जाते. यामधील एक विष्णुनचे आवेशावता परशुराम आहेत.
अश्वत्थामा बलिव्र्यासो हनूमांश्च विभीषण।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन।।
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।
या श्लोकानुसार अश्वत्थामा, राजा बलि, महर्षि वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, भगवान परशुराम तसेच ऋषि मार्कण्डेय अमर आहे। अशी मान्यता आहे की, परशुराम वर्तमान काळातही एखाद्या ठिकाणी तपस्येत लीन आहे.