महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाच्या रायगड जिल्हा मेळावा व पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी रसायनी विभागातील रिस येथील पोलिस पाटील महेश किसन जांभळे यांची कोकण विभागीय सदस्यपदी तर कांबे वात गावचे पोलिस पाटील जीवन अनंत म्हात्रे यांची रायगड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.याबाबतचे सनदपत्र आमदार अनिकेत तटकरे,गाव कामगार पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, संस्थापक भिकाजी पाटील,माजी जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र दुद्दुसकर आदी उपस्थित होते.महाराष्ट्र गाव कामगार पोलिस पाटील संघाच्या कोकण विभागीय सदस्यपदी रसायनी रिस येथील महेश किसन जांभळे व जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी जीवन अनंत म्हात्रे यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.