जन्म. ३ मे १९५२
साठ च्या दशकात गंगा जमुना या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या अरुणा इराणी यांनी तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. १९६१ मध्ये गंगा जमुना या सिनेमात काम करणा-या अरुणा यांचे त्यावेळी वय केवळ नऊ वर्षे होते. ‘जहां आरा’, ‘फर्ज’, ‘उपकार’, ‘आया सावन झूम के’, ‘कारवां’ यांसारख्या हिट सिनेमांमध्ये अरुणा इराणी यांनी काम केले. कारवां या सिनेमातील अरुणा इराणी यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. या सिनेमातील ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’, आणि ‘दिलबर दिल से प्यारे’ ही गाणी अरुणाच्या डान्समुळे लोकप्रिय झाली. १९७२ मध्ये अरुणा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह ‘बॉम्बे टू गोवा’ या सिनेमात स्क्रिन शेअर केली. या सिनेमात महमूदसुद्धा होते. अरुणा यांचे नाव त्याकाळी महमूद यांच्यासोबत जुळले होते. त्यांनी महमूद यांच्यासह ‘औलाद’, ‘हमजोली’, ‘नया जमाना’, ‘गरम मसाला’ आणि ‘दो फूल’ या सिनेमांमध्ये काम केले.
‘थोड़ा रेशम लगता है’, ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’, ‘दिलबर दिल से प्यारे’, ‘मैं शायर तो नहीं’ हे ही जी सुपरहिट गाणी आहेत, ती अरुणा इराणी यांच्या डान्समुळे आणखीनच प्रसिद्ध झाली. अरुणा यांनी इंडस्ट्रीत येणा-या नवोदित अभिनेता-अभिनेत्रींना खूप मदत केली. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या काही कलाकारांच्या बाबतीत अरुणा इराणी खूप ‘लकी’ ठरल्या आहेत. ज्यांनी आपल्या पदार्पणातील चित्रपटात अरुणा इराणी यांच्यासोबत काम केले ते पुढे ‘स्टार’ झाले आहेत. जीतेंद्र (फर्ज), ऋषी कपूर व डिम्पल कपाडिया (बॉबी), शबाना आझमी (फकिरा), जयाप्रदा (सरगम), कुमार गौरव (लव्हस्टोरी), संजय दत्त (रॉकी). या सर्व चित्रपटात अरुणा इराणी यांनी काम केले होते. त्यांनी ‘फर्ज’मध्ये जितेंद्र, ‘बॉबी’मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया, ‘सरगम’मध्ये जयाप्रदा, ‘लवस्टोरी’मध्ये कुमार गौरव आणि ‘रॉकी’मध्ये संजय दत्तची बरीच मदत केली. मात्र हे सर्व सुपरस्टार बनले आणि दुर्दैवाने अरुणा इराणी या सहायक अभिनेत्रीच राहिल्या. ‘पेट प्यार और पाप’ आणि ‘बेटा’ या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी अरुणा यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आपल्या करिअरमध्ये अरुणा यांनी मराठी सिनेमांमध्येही अभिनय केला. शिवाय छोट्या पडद्यावरही त्यांचे दर्शन घडले. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंगूमंगू’मध्ये अरुणा इराणी यांनी काम केले होते. २००० साली ‘जमाना बदल गया’ या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. आपल्या समुहाकडून *अरुणा इराणी* यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.