सागरगड -माची रस्त्याचा मंजूर निधी खर्च न केल्यामुळे पत्रकार बळवंत वालेकर करणार उपोषण
अलिबाग
वन विभागात वसलेल्या सागरगड -माची येथील आदिवासी वाडीस भौतिक सुविधा मिळण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर सनदशीर मार्गाने २२ वर्षे झगडले. व भौतिक सुविधा साठी १० एकर जमीन मिळविली. शिवाय जिल्हा नियोजन समिती कडून ४८ लाख रुपयांचा निधी मिळविण्यातही ते यशस्वी झाले.
पण हा निधी जिल्हा प्रशासनाकडून खर्च न झाल्यामुळे पत्रकार वालेकर राज्यपाल यांना भेटून निवेदन दिले. राज्यपाल यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजून २० लाख रुपयांचा तात्पुरता निधी मंजूर केला.
या बैठकीस पत्रकार वालेकर निमंत्रित म्हणून उपस्थित होते. हा निधी ३१ मार्च २२ पूर्वी खर्च करण्यासाठी पत्रकार वालेकर यांनी जिल्हाधिकारी यांना ५ पत्रे लिहिली.
तरीही कार्यवाही नाही. म्हणून ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर व त्यांचे सहकारी दि, १ मे च्या महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करतील.
त्यानंतर खःडाळे-पवेळे-रुळे- सागरगड- माची या रस्त्यासाठी पत्रकार वालेकर यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समिती कडून जा. क्र. कार्या- २/ जि. वा. यो. / ०९-१० / दि. ११/११/२००९ नुसार ४९ लाख रुपयाःचा निधी मंजूर झाला.
व प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यताही मिळाली . परंतु या आदिवासी वाडीच्या रस्त्यासाठी दमडाही खर्च पडलेला नाही.
शेवटी पत्रकार वालेकर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिँह कोश्यारी यांना भेटून निवेदन दिले.
त्यानंतर राज्यपाल यांनी प्र.क्रई./ आदि/ कक्ष/ बळवंत वालेकर/ अक्रई/११०१९/(५४) २०२१/ दि. ६/७/२१ नुसार “मंजूर निधी आदिवासी वाडीच्या रस्त्यासाठी खर्च करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले.
म्हणून जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आपल्या होता दालनात घेतली.व सदर रस्त्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
या बैठकीस पत्रकार वालेकर निमंत्रित होते. म्हणून पत्रकार वालेकर उपस्थित होते. हा निधी ३१मार्च २२ पूर्वी खर्च करावयाचा होता. या निधीच्या कार्यवाही बाबत संपादक वालेकर यांनी दि.२१/१२/२१ ,दि. ३१/१/२२, दि.१७/२/२२, दि.२५/२/२२ व दि.४/३/२२ अशी ५ पत्रे जिल्हाधिकारी यांना लिहिली. पण कोणतीही कार्यवाही नाही.
जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला निधी जिल्हा प्रशासनाने खर्च केलेला नाही राज्यपाल यांच्या आदेशाचाही जिल्हा प्रशासनाने भंग केला आहे. म्हणून ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर व त्या़चे सहकारी दि. १ मे च्या महाराष्ट्र दिनी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.