जन्म. १३ जून १९०५
भारतात सरोदार इथे जन्मलेले आणि दुलीप म्हणून ओखळले जाणारे दुलीपसिंहजी हे महान क्रिकेटपटू रणजीतसिंहजी यांचे भाचे होत. दुलीपसिंहजी हे इंग्लंडकरता कसोटी सामने खेळलेले दुसरे भारतीय खेळाडू होते. १९३०मध्ये लॉर्ड्स येथील अॅ्शेस कसोटीतील पहिल्या डावात त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७३ धावांची खेळी साकारली. मात्र डॉन ब्रॅडमन यांच्या २५४ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडला या कसोटीत पराभूत व्हावे लागले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुलीपजी १२ कसोटी सामने खेळले तरी त्यांनी ५८च्या सरासरीने धावा केल्या. त्यांनी १९३० मध्ये सरेतर्फे खेळताना नॉर्दम्प्टनशायरविरुद्ध ३३३ धावा तडकावल्या. पुढे ते भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त बनले. श्री दुलीपसिंहजी यांच्या स्मरणार्थ दुलीप करंडक असे नाव देण्यात आले आहे.क्रिकेटपटू वसंत रायजी यांनी दुलीपसिंहजी यांच्या वर पुस्तक लिहिले आहे. दुलीपसिंहजी यांचे ५ डिसेंबर १९५९ रोजी निधन झाले.