मराठीतील साहित्यकृती कन्नडमध्ये अनुवाद विरुपाक्ष करत होते. विरुपाक्ष यांनी संरक्षण खात्याच्या उच्च क्षमता स्फोटके कारखाण्यात इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून अनेक वर्षे काम केले. वाचन आणि लिखाणाच्या आवडीतून कुलकर्णी दाम्पत्याने अनुवादाच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम केले. विरुपाक्ष यांनी मराठीतील साहित्य कन्नडमध्ये अनुवादीत केले तर त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी यांनी कन्नड साहित्य मराठी भाषेत आणले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक विरुपाक्ष यांनी अनुवादीत करत अनुवादाच्या क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. आजवर त्यांनी २० पुस्तकांचा कन्नडमध्ये अनुवाद केला आहे. ज्यामध्ये पु. ल. देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि बाबा आमटे यांच्या ‘आहे मनोहर तरी’, ‘भैरप्पा-कारंथ लेखन समीक्षा’, विश्वनाथ खैरे यांचे ‘मिथ्यांचा मागोवा’ या साहित्यकृती देखील त्यांनी अनुवादित केल्या आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वाङ्मय’ या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले आहे. मुंबई-कर्नाटक संघाचा वरदराजन आद्या पुरस्काराने त्यांना गौरविले होते. तसेच पु.ल.देशपांडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि बाबा आमटे यांचे चरित्रही त्यांनी मराठीतून कन्नडमध्ये अनुवादीत केले आहे. विरूपाक्ष कुलकर्णी यांचे १६ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.