रसायनी

कै.काॅम्रेड घनश्याम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुस्तक प्रकाशन

काॅम्रेड घनश्याम पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या 50 वर्षांतील कार्या बाबतच्या पुस्तकाचे प्रकाशन अॅड. सुरेश ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी अनेक मान्यवर व लढाऊ कार्यकर्ते, वकील डॉक्टर, शेतकरी,कामगार नेते मोठया संख्येने उपस्थित होते. काॅम्रेड घनश्याम पाटील हे बोकडविरा गावचे 25 वर्ष सरपंच होते तसेच कामगार नेतेही होते.

त्यांनी समाजासाठी अनेक लढ्यांचे नेतृत्व केले.तुरुंगवास भोगला.त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची सर्वसामान्यांना आडवण राहावी यासाठी काॅम्रेड घनश्याम पाटील यांच्या जिवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.