रसायनी
कोकण विकास समितीच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या ज्ञानदीप शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मदिनी विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनाचे शिबिर घेण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत असणारे सत्यवान रेडकर कनिष्ठ अनुवादक अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार ( संस्थापक तिमिरातून तेजाकडे संस्था) यांचे मार्गदर्शन लाभले.
कोकण विकास समिती संस्थापक अध्यक्ष जयवंतराव दरेकर यांच्या विशेष प्रयत्नातून कोकणाच्या मुलांचा शासकीय सेवेतील टक्का वाढावा या उद्देशाने सत्यवान रेडकर यांनी हे व्याख्यान व मार्गदर्शन शिबिर यासाठी बहुमोल योगदान दिले आहे.
कोकण विकास समिती स्थापनेचा उद्देश, सद्या कोकण विकास समितीचे कार्यक्षेत्र असणारे रायगड,पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी सिंधुदुर्ग व याच्या लगतचा येणारा सह्याद्री घाटमाथा प्रदेश या भागात विविध क्षेत्रातील शासकीय ग्रामीण विकास सुविधा-कामांचा पाठपुरावा, विशेषतः शिक्षण, नोकरी, व्यवसाय, रोजगार, शेती, आरोग्य, क्रीडा व ग्रामीण भागातील नागरी सोयी सुविधा, वाहतूक, दळणवळण, संपर्कसाधने, नैसर्गिक आपत्ती निवारण मदत, यासाठी कोकण विकास समिती मार्फत सुरू असणारे शासकियस्तरावरील पाठपुरावे-प्रयत्न व भविष्यातील विविध क्षेत्रात काळानुरूप आवश्यक ते नियोजन त्यासाठी आवश्यक ती तयारी याबाबतची माहिती सदस्य शरद भोसले यांनी दिली.
या प्रसंगी कोकण विकास समितीचे सदस्य सुनील सावंत,संजय दरेकर,शरद भोसले,प्रमोद दळवी, रवींद्र जाधव यांचेसह ज्ञानदीप महाविद्यालयाचे संस्था सचिव प्रकाश गुजराथी, प्रा.भरत मोरे, कुलकर्णी सर,किरण हरिश्चंद्र दरेकर यांच्या सह ज्ञानदीप महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
यापुढे विद्यार्थ्यांसाठी असे शैक्षणिक कार्यक्रम राबविल्यास ज्ञानदिप संस्था कायम सहकार्य करेल व कोकण विकास समितीने यासाठी पुढाकार घ्यावा असे मनोगत संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक भरत मोरे सर यांनी व्यक्त करत कोकण विकास समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.