सायबर फसवणूक रोखण्यासाठी सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मार्गदर्शन संपन्न ….

0
27

सहज सेवा फाउंडेशनचा शिक्षणं क्षेत्रातील सातत्यपूर्ण उपक्रम….

खोपोली…

विद्यार्थ्याच्या मनातील सामजिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी तसेच माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशन मार्फत सातत्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरू असतात.
शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीमध्ये सामजिक समस्या,लैंगिक समस्या व शंका असतात.दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातुन होणारी फसवणूक,सोशल मीडियाच्या अती व चुकीच्या वापराने होणारे नुकसान, आपली जबाबदारी व कर्तव्य यावर आजही समाजात मोकळेपणाने संवाद साधला जात नाही.यातील अज्ञानामुळे विपरीत परिणाम सुध्दा शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर होत असतात.
सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातुन शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नामांकीत डॉक्टर्स व समुपदेशक यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय वर्ष ( 2022-23) या वर्षात विवीध शाळांमध्ये मार्गदर्शन संपन्न होत आहेत.याच अनुषंगाने सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल,शीळफाटा येथील कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी मार्गदर्शन सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी जैन भवन,शीळफाटा येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तराच्या मार्गाने प्रभावी प्रबोधन केलें.
यावेळी सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल,शिळफाटाच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके,सना जीलानी,धनश्री भोईर,अश्विनी सोलंकी तसेच खोपोलीचे माजी नगराध्यक्ष व शीळफाटा जैन संघाचे अध्यक्ष सोहनराज राठोड,जैन समाजाचे गुरुवर्य मनवित,संग्राम देशमुख उपस्थित होते.आजच्या उपक्रमास सुमारे 100 पेक्षा ज्यास्त विदयार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे,खजिनदार संतोष गायकर,संघटक निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,मार्गदर्शक मोहन केदार व उपक्रम प्रमूख दिवेश राठोड यांनी अथक परिश्रम घेतले.या उपक्रमासाठी सह्याद्री इंग्लिश स्कूलचे चेअरमन नरेंद्र शाह,जैन संघ,शीळफाटा यांचे विशेष सहकार्य लाभले.

ऑनलाइनच्या माध्यमातुन होणारी फसवणुक व आपली सतर्कता हे विदयार्थीदशेत खुप महत्त्वाचे आहे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक प्रगतीसाठी करावा असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी केले.
शाळेमध्ये अश्या प्रकारच्या अभियानामुळे विदयार्थी नक्कीच प्रगत होतील व आपल्याला काय बनायचे आहे ?याचे आत्मपरीक्षण करुन जीवनात यश मिळवावे असा आशावाद गुरुवर्य मनवित यांनी व्यक्त केला.