जन्म.१६ एप्रिल १९९०
प्रिया बॅनर्जीचा जन्म कॅनडा मध्ये झाला. तिचे वडील इंजिनियर आहेत. तर आई एक गृहिणी आहे.प्रिया बॅनर्जीचं कुटुंब मूळचं कोलकत्ता बंगालचे आहे.प्रियाने कॅनडामध्ये मॉडेलिंग आणि टीव्ही होस्ट म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. या दरम्यान तिला मिस कॅनडा स्पर्धेत भाग घेण्याची संधीही मिळाली. या स्पर्धेत तिला मिस फोटोजेनिकचा किताब मिळाला. कॅनडाच्या फॅशन इंडस्ट्रीत काही वर्षे काम केल्यानंतर ती भारतात आली. प्रियाने भारतात येऊन अभिनेते अनुपम खेर यांच्या ड्रामा स्कुलमधून अभिनयाचं शिक्षण घेतले.अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर तिने टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ती अभिनेता वरुण धवनसोबत एका जाहिरातीतही दिसली होती.
प्रियाने २०१३ मध्ये तेलगू चित्रपट “KISS” चित्रपटांमध्ये अभिनय करुन चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटात तिने प्रियाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अदिवी सेष दिसला होता. यानंतर तिने अनेक तेलुगू, हिंदी आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये असुरा, जज्बा, 3 देव, बारिश या चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांव्यतिरिक्त प्रियाने वेब सीरिजमध्येही काम केले आहे, २०१९ मध्ये ती एमएक्स प्लेयरच्या हॅलो मिनी या मालिकेत दिसली होती. या वेब सीरिजमध्ये तिने इशिताची अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती.
सध्या एकता कपूरची ‘बेकाबू’ ही वेबसीरीज प्रचंड चर्चेत आहे. या वेबसीरीजने बोल्डनेसच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.या वेबसीरीजमुळे प्रिया बॅनर्जी फारच चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री आपल्या बोल्ड अँड हॉट अंदाजाने सर्वांनाच घायाळ करत आहे.