बहुजन युथ पॅथरचे जिल्हा अध्यक्ष सुशिलभाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पॅथरच्या खालापूर तालुक्यातील पदाधिकारी व सदस्यांमुळे चौक तुपगाव रेशनिंग दुकानातील काळाबाजार उघडकीस आला असून जिल्हा पुरवठा शाखेने तुपगाव येथील रेशनिंग धान्य दुकानाचा परवाना रद्द केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
तुपगाव रेशनिंग दुकानांत तांदूळ, गहू,साखर आदी वस्तू यात घोटाळा होत असल्याचा प्रकार सुरू होता.अनेक नागरिकांनी सदर प्रकाराबाबत बहुजन युथ पॅथरकडे तक्रार केली होती.यावेळी सामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी बहुजन युथ पॅथरचे जिल्हा अध्यक्ष सुशिलभाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौक शहर अध्यक्ष निलेश मोरे,अनिकेत गायकवाड,चौक शहर उपाध्यक्ष अल्पेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते मनोज कुंभार,प्रविण रोकडे,किशोर मोरे, रोहित पवार, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, विशाल वाघमारे, जतिन मोरे, राहुल जाधव, खालापूर तालुका अध्यक्ष संदेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष रोशन मोरे, तालुका सरचिटणीस सुरज केदारी, किशोर साळुंखे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून रेशनिंग घोटाळा उघडकीस आणला.यात प्रशासन चौकशीतून 5 लाख 80000 हजार रुपयांचा घोटाळा उघड होवून तुपगाव रेशनिंग दुकानाचा परवाना 23 मे रोजी रद्द करण्यात आल्याचे समजते.