जन्म.१६ एप्रिल १९६४
फिल्म मेकिंगची आवड बल्की यांना असल्याने कॉलेजनंतर मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दिग्दर्शनाचा कोर्स करण्याचे त्यांनी ठरवले. पण त्यांची मुलाखत घेणारे पॅनल न आवडल्याने बल्कींनी स्वत:च ‘वाक आऊट’ करीत, या इस्टिट्यूटला बाय बाय केले. यानंतर त्यांनी चक्क कॉम्प्यूटर अप्लिकेशन कोर्समध्ये प्रवेश घेतला. पण तिसऱ्या वर्षाला कमी हजेरीमुळे त्यांना या कोर्समधून बाहेर काढण्यात आले. याच काळात क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींनी बल्कींना अक्षरश: झपाटले होते. पण एकेदिवशी पेपरमध्ये ‘मुद्रा’या जाहिरात एजन्सीची जाहिरात बघितली आणि बल्कींना नवी वाट गवसली. डोक्यातून आल्या. सर्फ एक्सेल साठी ‘दाग अच्छे हैं’, टाटा चहा साठी ‘जागो रे’, आइडिया सेल्यूलर लिमिटेड कंपनी साठी ‘व्हाट एन आईडिया सर जी’ या जाहिरातील अशा टैगलाइन कल्पना बल्की यांच्या प्रसिद्ध आहेत. या सोबतच त्यांनी हेवेल्स, तनिष्क,आईसीआईसीआई प्रुडेंशियल, हमारा बजाज, ब्रिटानिया, पेप्सोडेंट या जाहिराती त्यांनी केल्या. २००७ मध्ये बल्कींनी स्वत:च ‘चीनी कम’ची कथा लिहिली, ते डायरेक्शनमध्ये उतरले आणि बॉलिवूड मध्ये ‘पा’, ‘इंग्लिश विंग्लीश’,‘शमिताभ’ आणि आता ‘की अॅ ण्ड का’, ‘पॅड मॅन’ या सारख्या चित्रपट बनवल्या. खऱ्या आयुष्यातून उसणे अनुभव चित्रपटात मांडणे मला पटत नाही. त्यापेक्षा चित्रपटातून आयुष्यासाठी काहीतरी देणे, हा माझा प्रयत्न असतो. प्रत्येक चित्रपट मानवी आयुष्यात भर घालणारा असावा, असे माझे मत आहे, असे बल्की यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
दिग्दर्शक आर.बालकृष्णन उर्फ आर. बल्की यांनी चित्रपट दिग्दर्शिका गौरी शिंदे यांच्या बरोबर लग्न केले आहे.