जन्म. १७ जुलै १९३५ रोजी सेंट जॉनमध्ये (कॅनडा)
डॉनल्ड सदरलँड हा एक चांगला अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेत. आठ वेळा गोल्डन ग्लोब नामांकन मिळून, त्यापैकी दोन वेळा गोल्डन ग्लोब आणि एकदा एमी पुरस्कार मिळवलेल्या सदरलँड यांनी आपल्या अभिनयाने अनेक उत्तमोत्तम सिनेमे गाजवले आहेत. ‘थ्रेशोल्ड’ सिनेमासाठी त्याला कॅनडियन अकॅडमी अॅवॉर्ड मिळालं आहे. दी डर्टी डझन, मॅश, केली’ज हिरोज, क्ल्युट, डोन्ट लूक नाऊ, १९००, आय ऑफ दी नीडल, ए ड्राय व्हाइट सीझन, बफी दी व्हॅम्पायर स्लेयर यांसारख्या फिल्म्समधून त्याने आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावली आहे. त्याला एक एमी आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.