कर्जत । तालुक्यातील क्रांतिकारक अॅड विठ्ठलराव कोतवाल आणि हिराजी पाटील हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झाले आहेत. या दोन्ही हुतात्म्यांच्या ८२ व्या स्मृतिदिनी २ जानेवारी रोजी नेरळ येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. नेरळ येथे हुतात्मा स्मारक समितीचे वतीने मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झालेले हुतात्मा भाई कोतवाल (माथेरान) आणि हुतात्मा हिराजी पाटील (मानिवली) यांचा स्मृतिदिन २ जानेवारी रोजी साजरा होत आहे. या दोन्ही हुतात्म्यांच्या ८२ व्या स्मृतिदिनी नेरळ येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. भजन भूषण गजाननबुवा पाटील आणि गीतकार अनंत पाटील यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला जाणार आहे. या सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड तसेच रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलीस उप अधीक्षक डी डी टेले, पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह कृषी रत्न शेतकरी शेखर भडसावळे आणि आंतर राष्ट्रीय चित्रकार पराग बोरसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.




















