कर्जत। नेरळ ग्रामपंचायत हदीमध्ये असलेल्या नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना देखील पाण्याची चोरी सुरु आहे. दरम्यान, याबदल नेरळ ग्रामपंचायतीकडून ज्या दोन ठिकाणी व्हॉल्व खोलून पाण्याची चोरी केली जाते, त्या ठिकाणी लोखंडी लॉक लावण्याचे आणि नजर ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायतीच्या प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
नेरळ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नळपाणी योजना १९९८ मध्ये बनविण्यात आली होती. ही योजना नेरळ गावातील ३६ हजार लोकसंख्येसाठी होती आणि त्या योजनेची मुदत २०१६ मध्ये संपली. त्या योजनेचे मुदत संपून आठ वर्षांचा काळ लोटला असून
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणाऱ्या परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नळपाणी योजना अपुरी पडत असते. ते लक्षात घेवून जीवन प्रापिकरण कडून नवीन नळपाणी योजना मंजूर असून त्या योजनेचे कामसुरू आहे.
नवीन नळपाणी योजनेचे काम करणेसाठी मोहाची वाडी येथील एकजलकुंभ तोडण्यात आले आहे. त्या वेळेपासून नेरळ गावात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत कार्यालयावर दररोज महिला आणि ग्रामस्थ हे मोर्चा घेऊन येत असतात.
पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी प्रशासनानेदेखील पाणीपुरवठा सर्व भागाला व्हावा, यासाठी वेळेचेनियोजन केले आहे. त्यानुसार प्रत्येक भागाला पाणी वितरीत केले जात असून नेरळ ग्रामपंचायतीमधील प्रत्येक भागाला कमी प्रमाणात का होईना, पण पाणी पोहचत आहे.
रात्रीच्या वेळी नेरळ बाजारपेठ हदिमधील कचरा उचलला जात असल्याने रात्री का करणारी ग्रामपंचायत मधील नेरळ ग्रामस्थ कौतुक करीत आहेत. मात्र याच नेरळ ग्रामपंचायतीमधील काही रहिवासी हे पाण्याचे व्हॉल्व रात्रीच्या अंधारात सोडून आपल्या भागाला अधिकचे पाणी ओढून घेत असल्याची बाब कर्मचारीवर्गाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे पाणी कर्मचाऱ्यांनी ही बाव प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामविकास अधिकारी अरुण कालें यांच्या कानावर घातली आहे.