राज्याचे उदयोगमंत्री व नवनिर्वाचीत रायगड जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट रेवदंडा निवासस्थानी घेतली, यावेळी त्यांचे समवेत महाडचे आमदार भरतशेठ गोगावले व अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी उपस्थित होते.

रायगड जिल्हाचे नवनिर्वाचीत पालकमंत्री उदय सामंत प्रथमच अलिबाग येथे नियोजीत जिल्हा नियोजन सभे निमित्‍त आले असताना,त्यांनी रेवदंडा येथे जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. रेवदंडा येथे सकाळी दहा वाजता राज्याचे उदयोग मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे निवासस्थानी पोहचले, यावेळी रेवदंडा निवासस्थानी जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी व राहूलदादा धर्माधिकारी यांनी स्वागत केले.
प्रसंगी जिल्हाचे पालकमंत्री उदय सांमत यांनी जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शाल,पुष्पगूच्छ प्रदान करून मानसन्मान केला, तर समवेत उपस्थित आमदार भरतशेठ गोगावले यांनी निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. यावेळी जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वतीने निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांनी जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांचा शाल,पुष्पगूच्छ प्रदान करून मानसन्मान केला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी अर्धा तास जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचेशी संवाद साधला. तद्नंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पुनश्च अलिबागकडे प्रस्थान केले. यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे समवेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे-शिंदे गट जिल्हा प्रमुख राजा केणी, माजी जि.प.सदस्य संजय जांभळे यांची सुध्दा उपस्थिती होती.