खोपोली – खोपोली शहरातील काटरंग गावातून एक २७ वर्षीय तरुण १५ दिवसांपासून गायब असून, वडिलांच्या तक्रारीनंतर या तरुणाचा खोपोली पोलीस शोध घेत आहेत. १५ दिवस झाले मुलगा घरी आला नसल्याने, त्याचे आई वडीलांची चिंता वाढली आहे.

सागर संदेश पाटील (वय २७) असे या बेपत्ता तरुणाचे नाव आहेत. हा तरुण काटरंग येथील राहणारा असून, तो १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही. त्याच्या घरच्यांनी नातेवाईक, मित्रांकडे शोध घेतला, मात्र तरीही न सापडल्याने, त्याच्या वडिलांनी खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेत, सागर हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.

पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीसकर्मचारी वैशाली ढवालकर या घटनेचा तपास करीत आहेत. सागर पाटील हा सडपातळ असून, त्याचा रंग सावळा, उंची ५ फूट ४ इंच, केस काळे, चेहरा उभट, नाक सरळ असून, दाढी- मिशी कोरलेली असून, घरातून निघताना त्याने काळ्या रंगाचा फुलशर्ट निळ्या रंगाची पँट घातली होती. त्याच्या हाता धातूचा कडादेखील आहे. अशा वर्णनाचा तरुण कुठे आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती असल्यास खोपोली पोलीस ठाणे येथे ०८८०५४ ४६०२८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस कर्मचारी वैशाली ढवालकर यांनी केले आहे.