खोपोली। गारमाळ येथे हिरानंदानी यांची माउंट अल्टेरा ही कंपनी असून या कंपनीने फुरिस्टकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांना गेट लावत त्यांना कुलूप लावून बंद केल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कंपनीविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याकडे चावणी ग्रामपंचायतीनेही दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनाकडून केला जात आहे.
घाटमाथ्यावर चावणी ग्रामपंचायतच्या हदीत गारमाळ येथे हिरानंदानी यांचा मोठ्या प्रकल्प उभा राहत असून येथे मुंबई, पुण्याह्न घनंदाडगे येथे जागा घेऊन बंगले बांधून राहत आहे, मात्र येथे हिरानंदानी यांची माउंट अल्टेरा ही कंपनी असून तिने फ़ॉरस्टकडे जाणाऱ्या ग्रामस्थांचा दोन्ही रस्त्याला गेट लावून बंद केले असल्याने ग्रामस्थांचा रस्ता बंद केला आहे.
गारमाळ येथे बहुतांश ग्रामस्थांचा ट्ध व्यवसाय असून या जंगलात गाई महशी चारायला त्या रस्त्याने घेऊन जात असतात, तर स्थानिक ग्रामस्थहीया रस्त्याने मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. मात्र दोन्ही रस्त्यावर कंपनीने जाणूनबुजून गेट लावून त्यांना कुलूप लावून घेतले असल्याने कंपनी व्यवस्थापनाचा आडमुठेपणा चव्हाट्यावर आला आहे.
या कंपनीविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून चावणी ग्रामपंचायत आणि प्रशासनकंपनीवर काय कारवाई करणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष टाकून ग्रामस्थांचे दोन्ही सते चालू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.