जन्म. २१ एप्रिल १९२४ कोची येथे.
पी भास्करन यांचे वडील स्वातंत्र सैनीक होते. भास्करन यांनी आपल्या करियरची सुरुवात ऑल इंडिया रेडियो पासून केली होती. पुढे त्यांनी मल्याळम चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. भास्करन यांनी २५० हून अधिक चित्रपटासाठी ३००० हून अधिक गाणी लिहिली होती. त्यांनी ४४ मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तसेच त्यांनी ६ चित्रपट निर्माण केले आहेत. भास्करन यांनी काही चित्रपटात अभिनय केला होता. त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सम्मानित केले होते. पी भास्करन यांचे २५ फेब्रुवारी २०१७ रोजी निधन झाले.