खोपोली..

एकमेका सहाय्य करु, अवघेचि धरू सुपंथ या ब्रीद वाक्यावर खोपोली बाराखडी करणारं प्रभावी कार्य..

खोपोली नगरपालिका विभागातील निर्माण झालेल्या विविध नागरी समस्यावर खोपोलीतील मान्यवर एकत्र येवून सकारात्मक चर्चेने पर्यायी मार्ग काढण्यासाठी विवीध सामजिक, राजकिय, शैक्षणिक संस्था यातील पदाधिकारी यांनी एकत्र येत खोपोली बाराखडी नावाची संस्था स्थापन केलेली आहे.
खोपोलीतील नागरी समस्या वाढल्या असून याचा त्रास ही आता सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावू लागल्या आहेत.खोपोली नगरीवर प्रेम करणारी सहृदय जनता आपल्या शहरावर असणाऱ्या प्रेमापोटी शहर सुंदर व समस्या पासून दुर राहण्यासाठी खोपोली बाराखडी या मंचातून शहरासाठी विश्वासू पर्याय ठरणार आहे.
बऱ्याच वेळा प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असतो, वेळीच समस्याचे निराकरण न झाल्याने हि दुरी वाढत जाते यामुळे कळत नकळत शहराचा विकास थांबतो. नागरिक व प्रशासन यांच्यातील हा समन्वय घडवून आणण्यासाठी खोपोली बाराखडी ही शहरांतील नामवंत विचारवंत,ज्येष्ठ नागरिक, सुजाण नागरिक व विद्यार्थी यांच्या सोबतीने शहर सुंदर व समस्था विरहित राहण्यासाठी कार्य करणार आहे.
दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी खोपोली नगर परिषदेचे मुखयाधिकारी अनुप दुरे यांच्या दालनात खोपोली बाराखडीचे पदाधिकारी यांच्यात पाणी,रस्ते,आरोग्य,वीज व काही तांत्रिक बाबी संदर्भात विस्तृत चर्चा झाली. शहरांतील विवीध समस्यांवर नागरिकांच्या तक्रारी जाणून घेवून सहकार्य करण्याची भूमिका मुख्याधिकारी यांनी विषद केली.
यावेळी खोपोली बाराखडीचे अध्यक्ष दिनकर भुजबळ,कार्याध्यक्ष आशपाक लोगडे,उपाध्यक्ष नरेंद्र हर्डीकर,सचिव डॉ.शेखर जांभळे,खजिनदार प्रवीण जाधव, संघटक संजय करंजकर, महिला संघटक सुरेखा खेडकर,संपर्क प्रमुख मोहन केदार, सह सचिव निखिल गुरव,सह खजिनदार सतीश येरूनकर, सह संपर्क प्रमुख उबेद पटेल, कायदेशीर सल्लागार ॲड. जयेश तावडे यांचे अभिनंदन करून सर्वोत्परी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अनुप दूरे यांनी दिले आहे.
खोपोलीकरांनी या मंचात सामील होवुन शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाची मदत करावी असे आवाहन खोपोली बाराखडीच्या वतीने करण्यात आले आहे.