सोय नसल्याने रूग्णांची होते गैरसोय …

कोरोना काळात खालापूर तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत असतानाच  गरजू आणि सर्वसामान्य रूग्णांच्या उपचाराची मोफत व्यवस्था व्हावी या उद्देशाने सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत खोपोलीत कोविड रुग्णालय उभारले होते.आमदार महेंद्र थोरवे यांनी या रुग्णालयासाठी जवळपास 80 लाख रूपयांचा निधी दिली तर शेकापक्ष,इंडस्ट्रीज आणि सामाजिक संघटनांनी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे दिली होती.कोरोना महामारी आटोक्यात आल्यावर सर्व साहित्य आडगळीत धुळखात पडले आहे.तर सदर वैद्यकीय साहित्य पालिकेच्या रूग्णालयात उपयोगात आले असते तर रूग्णांचे प्राण वाचले असते अशी संतप्त प्रतिक्रिया खोपोलीकर देत आहेत.

मुंबई,पुणे महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोपोली शहर आहे.दोन्हीही महामार्ग शहरातून गेले आहेत.एक्सप्रेसवेवर दर दिवसाला आपघाताची मालिका सुरू आहे.आपघातातील जखमींना उपचारासाठी नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात दाखल केल्यावर प्राथमिक उपचाराशिवाय अत्यावश्यक सेवेची सुविधा नसल्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबई,नवी मुंबई,पनवेल शहरात हालवावे लागतात.दोन ते तीन तासाचा अंतर कापताना रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.तर रविवार दि. 11 डिसेंबर 2022 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटातील मॅजिक पॉईंट जवळ विद्यार्थ्यांच्या सहलीवरून परतलेल्या बसला झालेल्या अपघातात 41विद्यार्थी जखमींना पालिकेच्या रूग्णालयात आणण्यात आले होते.अत्यावश्यक सेवा उपलब्ध न झाल्यामुळे दोन दुर्दैवी विद्यार्थ्यांना जीव गमवावे लागत गंभीर जखभींनी एमजीएम रूग्णालयात हालविण्यात आलं होतं.

कोरोना काळात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आमदार निधीतून 80 लाख रूपायाचे साहित्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातू 2 व्हेंटिलेटर , 6 बायपॅप मशीन ,

मिळालं होते.शेकापक्षाच्या नेत्या चित्राताई पाटील यांच्या माध्यमातून 50 बेड, तालुक्यातील काही कंपनीच्या सी.एस.आर फंडातून 2 व्हेंटिलेटर , 6 बायपॅप मशीन आदि वैद्यकीय साहित्य उपलब्ध करण्यात आले होते.कोविड माहामारी आटोक्यात आल्यावर गेल्यावर वर्षापासून सर्व वैद्यकीय साहित्य खोपोली नगरपालिकेच्या रूग्णालयात  धूळ खात पडले असून त्याचा उपयोग कधी करणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.