रसायनी
चौक,रसायनी,पनवेल विभागातील मनमौजी माउंटेनीयर्सने पाच दिवसात पाच सुळके सर करून गडप्रेमींना अनोखी भेट दिली आहे,त्यामुळे माउंटेनियर्स यांच्यात उत्साह वाढला आहे.
इर्शाळगड, तेल बैला डावा, तेल बैला उजवा ,कल कराई, वजीर सुळका हे पाचकठीण सुळके रसायनीतील विनयप्रताप हनुमंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसात चढून ही मोहीम पार पाडण्यात आली.
यात १० ट्रेकर्सचा समावेश होता,त्यात विनयप्रताप सिंह,सुजित भगत,हर्षित भावसिर,चेतन फुलमाळी,अक्षय माळी, योगेश थोरात,केतन धोत्रे,अमन मिश्रा फोटोग्राफर आकाश सहानी आणि गाडी चालक रोहित पाटील या मोहिमेत सामील होते.
खालापूर तालुका व पनवेल तालुका यांच्या हद्दीवरील इर्शाळगड चा सुळका पहिल्या दिवशी सर केला.पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील तैल-बैला किल्या चा डावा इनरवॉल सर करून तिसऱ्या दिवशी तैल बैला चा उजवा इनरवॉल सर केला.
चौथ्या दिवशी कर्जत तालुक्यातील डाक बहीरी येथील कलकराई चा सुळका सर करून रात्रीचा प्रवास करून ठाणे जिल्ह्यातील शहापुर येथील वाशिंद मधील माहुली किल्यावरील सर्वात घातक मानला जाणारा वजीर सुळका सर करून महाराष्ट्रात एक नवा विक्रम प्रस्थापीत केला.
आजपर्यंत महाराष्ट्रात पाच दिवसात पाच सुळके कोणीच सर केले नाहीत,अशी माहिती ट्रेकर्स कडून प्राप्त झाल्याने हा एक इतिहास रचला गेल्याचे बोलले जाते.
मनमौजी माउंटेनर्स च्या टीम ने ५ दिवसात ५ सुळके पुर्ण करून एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.
त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.