खोपोली पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहज सेवा फाऊंडेशनचा उपक्रम संपन्न..
खोपोली…
सहजसेवा फाऊंडेशन हि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते.विवीध सातत्यपूर्ण सामजिक उपक्रमातून समाजास उपयुक्त उपक्रम हे संस्थेचे वैशिष्ट ठरलेले आहे.सामजिक उपक्रमाच्या याच भावनेतून खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांनी बाहेरगावी सुट्टीवर अथवा कामानिमित्त जात असताना घ्यावयाची काळजी यासाठी शहरातील सोसायटी मध्ये काही सूचनांचे फलक लावण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी खोपोली पोलीस स्टेशन येथे संपन्न झाला. खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार व उपक्रम प्रमुख तुषार अगरवाल यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले.
खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शिरीष पवार साहेब यांनी खोपोली शहरातील उपस्थित असलेल्या सोसायटी पदाधिकाऱ्यांना सुरक्षा विषयक सूचना देताना बहुमोल मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी सहज सेवेच्या सामजिक कार्यात नेहमीच मोलाचे सहकार्य करणारे अगरवाल प्रिंटर्स, शिळफाटा यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार, खजिनदार संतोष गायकर,संघटक निलम पाटील,जनसंपर्क प्रमूख जयश्री कुलकर्णी,मार्गदर्शक मोहन केदार, राजेंद्र अगरवाल,नरेंद्र हर्डीकर,संजय करंजकर,सचिन गवळी,दिपाली जोशी तसेच उपक्रम प्रमुख तुषार अगरवाल यांनी अथक परिश्रम घेतले.
समाजात निर्माण होणारी गुन्हेगारी पाहता आपण सतर्क राहणे गरजेचे असून सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराने आपले आयुष्य संकटात जावू नये यासाठी सावधान राहूया असे आवाहन प्रकल्प प्रमुख तुषार राजेंद्र अगरवाल यांनी केले आहे.