अभी युवा ग्रूप,देवन्हावे यांच्या वतीने किल्ले व रांगोळी स्पर्धा संपन्न…
स्व.अभी तावडे व स्व.रोहित कडव या मित्रांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे आयोजन..

देवन्हावे…
देवन्हावे गावातील गेली आठ वर्षापासून सामाजिक बांधीलकी जपणारा अभि युवा ग्रुप हे आपल्या स्व.अभी तावडे या मित्राच्या समरणार्थ विविध सामाजिक कार्यक्रम करीत असतात. त्यातच चार महिन्यांपूर्वी देवन्हावे येथील सर्वांच्या जिवाभावाचा मित्र स्व.रोहित कडव याचे दुःखद निधन झाले त्यामुळे स्व.अभि तावडे व स्व. रोहित कडवं यांची स्मृती कायम स्मरणात जिवंत रहावी यासाठी देवन्हावे येथील अभि युवा ग्रुप हे विविध सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम हे करीत असतात.7 वर्षापासून सातत्यपूर्ण काम करीत असताना संस्थेत कुणीही पदाधिकारी नसुन सर्वच सदस्य मिळून करणारे कार्य हे संपूर्ण रायगड रायगड जिल्ह्यात मैत्री जपणारे एक आगळेवेगळे उदाहरण आहे.
या वर्षी दिवाळी सणानिमित्त महड येथील आदित्य वृधश्रमाला भेट देऊन आजी आजोबा समवेत फराळ देऊन दिवाळी साजरी केलेली आहे.
तसेच दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी देवन्हावे येथील आदिवासी वाडीतील नागरिकांना मिठाई देऊन दिवाळी भेट दिली.
यावर्षी अभी युवा ग्रूपच्या वतीने रांगोळी व किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. पार पडलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.ऐश्वर्या चौधरी, द्वितीय क्रमांक वैशाली पाटील तसेच तृतीय क्रमांक अंकिता पाटील व शीतल तावडे यांनी क्रमांक पटकावला. तसेच किल्ले स्पर्धा यात प्रथम क्रमांक साहिल पाटील,द्वितीय क्रमांक कृतार्थ तावडे,तृतीय क्रमांक आर्या पालकर यांनी पटकावला. या स्पर्धेत एकूण 35 स्पर्धकानी भाग घेतला होता.
सर्व विजेत्यांना दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी खालापूर तहसीलचे तलाठी, प्रसिद्ध व्यंगचित्रकार तसेच भारतीय सैन्य दलातील सेवा निवृत्त भरत सावंत व सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे या प्रमूख पाहुण्याच्या हस्ते व सहजसेवा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा इशिका शेलार, सागरिका जांभळे,नितीन चौधरी,एकनाथ नलावडे,रामकृष्ण पालकर,गुरुनाथ नलावडे ,राजेश आंबवणे,कमलाकर चौधरी,दिनेश नलावडे तसेच अभि युवा ग्रुपचे सर्व सदस्य व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवतेज तावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.जयेश तावडे यांनी केले.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार वाणी, अतिष पाटील, अक्षय चौधरी , गौरव बारस्कर, सिद्धीक बारस्कर, उज्वल पाटील अँड जयेश तावडे ,जयेश पालांडे,राज पाटील,यश पाटील,शुभम नलावडे,हर्षल चौधरी, शिवतेज तावडे,श्रेयस चौधरी,सौरभ कडव,रोहित नलावडे,साहिल पाटील,कुणाल पाटील,अवधूत पालांडे, सुजल नलावडे, निशांत चव्हाण,शुभम पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

आपल्या स्वर्गवासी झालेल्या सहकारी मित्रांविषयी स्मरणाची भावना ठेवून सातत्यपूर्ण समाजकार्य करीत असलेल्या अभी ग्रुपचे कार्य हे खरोखरी उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन यावेळी भरत सावंत यांनी केले.