जन्म. १७ जुलै १९३०
१९५८ साली नर्गिस यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लाजवंती’ या चित्रपटापासून सचिन भौमिक यांनी पटकथा लेखनाला सुरुवात केली. त्यानंतर १९६० साली बलराज साहनी व लीला नायडू यांच्या अभिनयाने गाजलेल्या ‘अनुराधा’ चित्रपटाला त्यावर्षीचा उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने भौमिक कथा-पटकथा लेखक म्हणून प्रस्थापित झाले. ‘आई मिलन की बेला’, ‘जानवर’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘गोलमाल’, ‘हम किसीसे कम नहीं’ यांसारख्या चित्रपटांपासून ते थेट अलीकडच्या ‘क्रिश’, ‘किसना’, ‘कोई मिल गया’ यांसारख्या ७० हून अधिक चित्रपटांचे पटकथा लेखन करणारे सचिन भौमिक यांनी नासिर हुसैन, हृषिकेश मुखर्जी, सुभाष घई, प्रमोद चक्रवर्ती, जे ओमप्रकाश, राकेश रोशन यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले होते. त्यानंतर १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ या शम्मी कपूर-राजश्री अभिनीत चित्रपटासाठी त्यांना पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. भौमिक यांचे अनेक चित्रपट यशस्वी झाले. *सचिन भौमिक* यांचे १२ एप्रिल २०११ रोजी निधन झाले. *सचिन भौमिक* यांना आदरांजली.