कीर्ती ओसवाल यांच्या पुढाकारातुन कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन..

0
38

भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ट व कोकण विभागीय उपाध्यक्ष किर्ती ओसवाल यांचे संयुक्त विद्यमाने खोपोलीत लोहाणा समाज सभागृह, खोपोली येथे बुधवार दिनांक 02 नोव्हेंबर 2022 रोजी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन पनवेल महापालिकेचे माजी महापौर तथा भारतीय जनता पार्टी खोपोली मंडळाचे संपर्क प्रमुख सुनिल घरत यांचे हस्ते करण्यात आले यावेळी अनेकांनी तपासणी करून घेत या उपक्रमाचे स्वागत केले. किर्ती ओसवाल हे खोपोली भाजपाचे क्रियाशील कार्यकर्ते असून सामाजिक,आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात काम करीत गोरगरिब, गरजूंना अशा उपक्रमातून सहकार्याच्या भावनेतून काम करतात. सामाजिक भावनेच्या जाणिवेतून कॅन्सर मुक्त अभियान व जनजागृती अभियानांतर्गत मोफत शिबिर राबविण्यात आले.यावेळी अत्याधुनिक मशिनरी द्वारे तंज्ञाकडून मोफत कॅन्सर तपासणी करण्यात करण्यात आली.यामध्ये पुरूषांच्या छातीतील कर्क रोग,स्त्रिया स्तनाचा व गर्भाशय याचा कॅन्सर आदीची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमा प्रसंगी बोलताना घरत यांनी या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करीत कीर्ती ओसवाल यांना धन्यवाद देत शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा अश्वविनी पाटील,शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल,सेक्रेटरी हेमंत नांदे,प्रमोद पिंगळे,मा.नगरसेविका अपर्णा मोरे,उपाध्यक्ष दिलीप पवार, कामगार आघाडीचे सूर्यकांत देशमुख,अनिल कर्णूक,राहूल जाधव,गोपाळ बावसकर,हिम्मत मोरे तसेच खोपोली महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा काटे,सेक्रेटरी अश्विनी अत्रे,चिटणीस सुनिता महर्षी,स्नेहल सावंत,आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.