रसायनी पाताळगंगा परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत वडगाव आणि टाटा मेमोरियल सेंटर प्रिव्हेन्टीव्ह अनकाॅलाजी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोग जनजागृती आणि तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार दि.28 रोजी वडगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात करण्यात आले होते.स्वातंत्र अमृतमहोत्सवानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे समजते.यावेळी सरपंच गौरी गडगे व बिर्ला कंपनीचे एच आर प्रकाश देसाई यांच्याहस्ते श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होवून कर्करोगावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कॅन्सर प्रतिबंध व्याख्यान सांगितले.सदर व्याख्यानाचा महिलांनी लाभ घेतला.या शिबिरात महिलांची सत्नाचा कर्करोग,गर्भांशयाचा,तोंडाचा कर्करोग आदी तपासणी मोफत करण्यात आल्या.यावेळी तज्ञ डॉ.प्रियंका आखाडे यांनी कर्करोग आजाराविषयी मार्गदर्शन केले.या शिबिराचा वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी दुपारी 4 :30 वाजेपर्यंत लाभ घेतला.
यात टाटा मेमोरियलचे डॉ.प्रियंका आखाडे व त्यांचे व्यवस्थापक तसेच बिर्ला कंपनीचे एच आर मॅनेजर प्रकाश देसाई,हरिष रावत उपस्थित होते.यावेळी सरपंच गौरी महादेव गडगे, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महादेव गडगे,हरिष पाटील, राजेश पाटील,संदेश मालकर, शिवाजी शिंदे, कल्पना ठोंबरे,सारिका गडगे, प्रकाश पवार, अंगणवाडी सेविका,आशासेविका,बचतगट पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे चौधरी, विकास पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.




















