कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील
नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून ती काढून टाकण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे हे रायगड जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषणास बसले आहेत.
कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रात सुरू असणारी आणि पूर्ण झालेली बांधकामे हटविण्यात यावी यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्यासाहित जिल्हा धिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर,रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील ,ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव,पोलीस अधीक्षक अशोक दुधे,कोकण विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासाहित अन्य अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहेत.
सदर निवेदनातं विजय हजारे यांनी नमूद केले आहे की,नेरळ कळंब राज्य महामार्ग क्रमांक 109,नेरळ-कशेळे राज्य महामार्ग क्रमांक 103,लोभ्याचीवाडी पिंपोळोळी नेरळ प्रस्तावित जिल्हा मार्ग 104 रस्त्यालगत झालेले व सुरू असलेली अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात यावी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक वेळा पत्रव्यवहार करून माहिती दिली आहे.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हार -बोपेले-धामोते हजारे नगर रामकृष्ण बोपेलेसाईनगर, कोल्हारे चार फाटा,उमनागर धामोते साईमंदिर परिसरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना व्हावी यासाठी रायगड जिल्हा परिषदला अनेक पत्रव्यवहार केली असून ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत संरक्षण भिंत बांधणे आदी विकास कामे व्हावी यासाठी यापूर्वी चार आंदोलने करण्यात आली आहेत.
पहिले उपोषण23ऑक्टोबर20108 रोजी कर्जत पंचायत समिती कार्यलयासमोर कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली असता त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन देत सर्व बांधकामे ही काढण्यात येथील असे लेखी आश्वासन देऊन सुद्धा त्याची आजपर्यंत अंमलबजावणी करणयात आली नाही.
तद्नंतर दुसरे आंदोलन कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीसाठी नळ पाणी पुरवठा योजना व्हावी यासाठी2 जानेवारी2019 रोजी साईमंदिर नाका कोल्हारे येथे आमरण उपोषण केले. त्यावेळी देखील रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन 7 मार्च 2019 रोजी दिले.
22 फेब्रुवारी2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आमरण उपोषण केले त्यावेळी सुद्धा रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले.परंतु त्यांनी त्यांचे आश्वासन आजपर्यंत पाळले नाही.म्हणून 5 मे 2022 रोजी परत कोकण विभागीय आयुक्त यांच्यासाहित जिल्हा धिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर,रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील ,ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव,पोलीस अधीक्षक अशोक दुधे,कोकण विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासाहित अन्य अधिकारी यांना निवेदन देऊन पंधरा दिवसांनी मुदत दिली होती.मात्र
ग्रामपंचायत हद्दीत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करणे,नेरळ कळंब राज्य महामार्ग क्रमांक 109,नेरळ-कशेळे राज्य महामार्ग क्रमांक 103,लोभ्याचीवाडी पिंपोळोळी नेरळ प्रस्तावित जिल्हा मार्ग 104 रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता खोदकाम करून झालेले व सुरू असलेली अनधिकृतपणे पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्राद्वारे कळवून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.अनधिकृतपणे पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे ते थांबवून सर्व पाईपलाईन काढून टाकणे,तसेच अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या नवीन पाईपलाईन कोणत्या योजनेतून मंजूर आहे या कामाची सखोल चौकशी करीत कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यावर मनमानी कारभार केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे.नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात यावे,नेरळ कळंब राज्य महामार्ग क्रमांक 109,नेरळ-कशेळे राज्य महामार्ग क्रमांक 103,लोभ्याचीवाडी पिंपोळोळी नेरळ प्रस्तावित जिल्हा मार्ग 104 रस्त्यालगत झालेले व सुरू असलेली अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात यावी,नेरल एसटी स्टँड येथे रस्त्याला संरक्षित भिंत बांधणे, कोल्हारे येथील प्रमुख रस्त्याला संरक्षित भिंत बांधणे,प्रमुख रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे,धामोते येथील आसरा आश्रम समोरील रस्ता काँक्रीटीकरण करणे,पेशवाई रस्ता काँक्रीटीकरण करणे,कोल्हारे खिंड ते कोल्हारे चार फाट्यापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे,नेरळ कळंब राज्य मार्ग ते नेरळ एसटी स्टँड येथील नाल्यापर्यंत आरसीसी गटार बांधणे या प्रमुख मागण्या आहेत, त्यासाठी 19 मे 2021 पासून आमरण उपोषण सुरवात केली असल्याचे असे हजारे यांनी सांगितले.