चौक,
जिल्हाधिकारी रायगड यांच्या दि.२४ मार्च २०२२ रोजीच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या खालापूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची प्रथम बैठक श्यामसुंदर साळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत ११ अर्ज प्राप्त झाले होते, त्याची छाननी झाल्यानंतर हे ११ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सर्व प्रथम या समितीचे कार्य व तिची माहिती अवगत करण्याचा आजच्या बैठकीत प्रयत्न झाला.
एवढया मोठ्या तालुक्यातून खूप मोठ्या संख्येने प्रस्ताव येणे अपेक्षित होते,असे अध्यक्ष श्यामसुंदर साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यापुढे योजनेची माहिती आणि तिचे गरजू लाभार्थी यांच्यासाठी आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते, महसूल विभाग, ग्रामपंचायत यांच्या मार्फत समितीचे सदस्य यांच्या समवेत प्रयत्न करून जास्तीजास्त लाभार्थी यांना अनुदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
बैठकीस तहसीलदार आयुब तांबोळी, गटविकास अधिकारी बालाजी पुरी,सदस्य संतोष विचारे,अनंता मेंगाळ,श्वेता मनवे, दीपक झेमसे,अनंता दळवी,दीपक पाटील,संदीप पाटील, अविनाश पाटील, अनंता पाटील,सचिव विजय पुजारी,अविनाश गुरळे, संतोष देवरुखकर, उपस्थित होते.
सर्वसाधारण ११०१,अनु.जाती ८५,अनु.जमाती २०४,श्रावण बाळ १४२,श्रावण बाळ जाती १२,जमाती१२१,सर्वसाधारण २१६,जाती ३१,जमाती ७२,वृद्धपकाळ २७५,विधवा ३२,विकलांग ०,राष्ट्रीय कुटुंब १८ प्रमाणे आतापर्यंत लाभ देण्यात येत असल्याची माहिती नायब तहसिलदार तथा सचिव विजय पुजारी यांनी दिली.





















