खोपोली…
खोपोली येथील सोमजाईवाडी येथे शनिवार दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी स्व.सरला इंगुळकर यांच्या प्रथम स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय,शेडूंग यांच्या अंतर्गत अजय इंगुळकर व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले.
या शिबिरात सर्दी,ताप,मलेरिया,डेंग्यू,बीपी,शुगर, टाचांचे आजार,गुडघे दुखी,कंबर दुखी, ऑक्सीजन लेव्हल,त्वचा रोग ,मासिक पाळी उपचार,वजन,उंची याची तपासणी करून औषधे देण्यात आली.
सोमजाईवाडी येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधोपचार शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विवीध सामाजीक,राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व सदस्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला.