माथेरान मध्ये पोलिसांकडून शांतता कमिटीची बैठक.
माथेरान संतोष खाडे
पर्यटनस्थळ अशी ख्याती असलेल्या माथेरान मध्ये कोणताही जाती धर्म भेद न बाळगता एकोप्याने माथेरान मध्ये प्रत्येक सण हे साजरे केले जातात.
अश्याच पद्धतीनं या पुढील सण माथेरान मध्ये साजरे करावे यासाठी दि.२९ रोजी माथेरान पोलीस ठाण्याकडून शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी माथेरान मध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अजय सावंत,राष्ट्रीय काँग्रेस माथेरान शहर अध्यक्ष मनोज खेडकर,माथेरान शिवसेना शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत,माथेरान मनसे शहर अध्यक्ष संतोष कदम, माथेरान मुस्लिम कमिटी समाज अध्यक्ष नासिर शारवान,क्षत्रिय मराठा समाज माजी अध्यक्ष कुलदीप जाधव,माथेरान व्यापारी मंडळ अध्यक्ष राजेश चौधरी,माथेरान अश्वपाल संघटना अध्यक्षा आशा कदम आदी मंडळी उपस्थित होती.
पुढील येणाऱ्या ३ मे रोजी अक्षय तृतीया ला माथेरान मध्ये शिवजयंती उत्सव मिरवणूक मोठया उत्साहात साजरी केली जाते.
तसेच यावर्षी ३ मे रोजी ईद उत्सव साजरा होणार आहे असे समजते.त्या अनुषंगाने माथेरान मध्ये हिंदू – मुस्लिम यांच्यात जातीय एकोपा राहावा व सर्व सण आनंदात होण्यासाठी सामाजिक सलोखा अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून माथेरान पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हे दोन्ही सण जाती धर्म न बाळगता साजरे करावे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे यांनी बैठकीच्या माध्यमातून केले आहे.